16.9 C
Latur
Wednesday, November 27, 2024
Homeलातूरवसतीगृहातील विषबाधेची कसुन चौकशी आवश्यक

वसतीगृहातील विषबाधेची कसुन चौकशी आवश्यक

लातूर : प्रतिनिधी
ल पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनीकेतनच्या वस्तीगृहातील विद्याथीनींना भोजनातून झालेली विषबाधेची घटना अत्यंत गंभीर असुन हा प्रकार कशामुळे घडला याची कसून चौकशी आवश्यक असलयाचे नमुद करुन पुन्हा इतत्र कुठेही असा प्रकार घडू नये याची दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.

पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनीकेतनच्या वसमीगृहातील विद्यार्थीनींना शनिवारी सायंकाळी जेवणानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल होणा-या विदयार्थीनीची संख्या वाढत असल्याची माहीती मिळताच माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी महाविदयालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते यांच्याशी संपर्क करुन तातडीने अधिकची यंत्रणा उभारण्याचे व जलदगतीने आवश्यक उपचार करण्याच्या सुचना केल्या. बहूतांश विद्याथ्यीनींना प्राथमिक उपचार करुन परत वसतीगृहावर पाठवून देण्यात आले. ५३ विद्यार्थीनींना मात्र रुग्णालयात अ‍ॅडमीट करुन घेण्यात आले होते.

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी यांनी काँग्रेस पक्षाच्या सहका-यांना रुग्णालयात पाठवून रुग्णालय प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करण्याच्या सुचना दिल्या होत्या. लातूरच्या खासदार डॉ. शिवाजी काळगे, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव व त्यांच्या सहका-यांनी विद्यार्थिनींवर होत असलेल्या उपचाराची माहिती घेतली, या कामी आवश्यकतेनुसार सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर आमदार देशमुख रात्री उशीरापर्यंत कायम रुग्णालयाच्या संपर्कात होते. रुग्णालयात दाखल सर्वच विद्यार्थीनीची प्रकृती आता एकदम ठीक असल्याचे महाविदयालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहीते यांनी आमदार देशमुख यांना रविवारी सकाळी सांगीतले. तेव्हा आमदार देशमुख यांनी रुग्णालयाच्या सर्व यंत्रणांनी युध्दपातळीवर कार्य केल्याबद्दल सर्वाचे कौतुक करुन आभार मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR