अहमदपूर : प्रतिनिधी
तालुक्यातील शेनकुड येथील मन्याड नदी पात्रावर बांधण्यात आलेल्या पुलाच्या बाजूला नदी पात्रात तीन युवक दि. ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ ते ४.३० वाजण्याच्या सुमारास पोहण्यास गेले असता त्यातील दोन युवकांचा नदीपात्रात खोदण्यात आलेल्या खोल खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात बुडून मृत्यू झालाची घटना घडली आहे. अहमदपूर तालुक्यातील शेनकुड येथील मन्याड नदी पात्रात बांधण्यात आलेल्या पुलाच्या बाजूला मन्याड नदी पात्रात अनिल बबन नागरगोजे वय १७ वर्ष रा टाकळगाव ( शेनकुड ) ता अहमदपूर, तुषार दत्ताराव पवार रा. धसवाडी ता.अहमदपूर व इतर एक मित्र राहणार हल्ली मु भाग्य नगर हे तीन युवक मन्याड नदी पात्रात सायंकाळच्या सुमारास दरम्यान पोहण्यास गेले होते.
परंतु ते पोहत असताना मन्याड नदी पात्रात खोदण्यात आलेल्या खोल खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे अनिल बबन नागरगोजे वय १७ वर्ष रा टाकळगाव ( शेनकुड ) ता अहमदपूर तुषार दत्ताराव पवार वय १७ वर्ष रा धसवाडी ता अहमदपूर या दोन युवकांचा बुडून जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहीती ११२ क्रमांकावर पोलीसांना मिळताच ए.एस.आय. वैजनाथ ंिदडगे , पोकॉ.राम रामोळे, चालक नारायण बेंबडे यांनी तात्काळ घटनास्थळावर भेट देऊन दोन्ही युवकांचे मृतदेह शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले असून अहमदपूर पोलीस ठाणे येथे एम एल सी दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.