28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमुख्य बातम्यारिलच्या नादात बस अपघात; गुजरातेत ६ ठार, ३५ जखमी

रिलच्या नादात बस अपघात; गुजरातेत ६ ठार, ३५ जखमी

अंबाजी : वृत्तसंस्था
गुजरातमधील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र अंबाजी येथे आज (७ ऑक्टोबर) भीषण रस्ता अपघात झाला. यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला, तर ३५ हून अधिक जण जखमी झाले. ५ ते ६ जणांची प्रकृतीचिंंताजनक आहे. बसमध्ये ५० हून अधिक प्रवासी होते.

अंबाजीतील त्रिशूलीया घाटात बसचे नियंत्रण सुटून उलटली. जखमींना पालनपूर आणि अंबाजी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. एका प्रवाशाने सांगितले की, घाटावर बस चढत असताना ड्रायव्हर मोबाईलने रील शूट करीत होता. आम्ही त्याला मनाई केली होती तरीही तो रील बनवण्यात व्यस्त राहिला. दरम्यान, घाटावरील हनुमान मंदिराजवळ रेलिंगला धडकल्याने बस उलटली. चालक घटनास्थळावरून पळून गेला होता.

त्याचवेळी चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे काही प्रवाशांचे म्हणणे आहे. यामुळे अपघातानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी त्याला लवकर पकडले आणि त्याची वैद्यकीय चाचणी केली तर संपूर्ण सत्य बाहेर येऊ शकेल. पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. बसमध्ये प्रवास करणारे सर्व जण अंबाजी मंदिराचे दर्शन घेऊन दांता शहरात परतत होते.

अपघातात बळी पडलेले बहुतांश भाविक हे खेडा जिल्ह्यातील कथलाल गावचे रहिवासी आहेत. अपघाताची माहिती मिळताच जखमींना मदत करण्यासाठी लोक जवळच्या गावात पोहोचले. महुधा तालुक्यातील महिसा गावात राहणारे राजेशभाई रोहित म्हणाले की, दरवर्षी नवरात्रीला आमच्या आजूबाजूच्या गावातील लोक अंबाजी मंदिराच्या कार्यक्रमाला जातात. या वेळीही रविवारी (६ ऑक्टोबर) सायंकाळी आमच्या महिसा गावातील १५ आणि कठालाल गावातील सुमारे २० जण अंबाजी मंदिरात गेले होते. ७ ऑक्टोबरला सकाळी हे सर्व लोक घरी परतत होते. यादरम्यान त्यांचा अपघात झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR