16.2 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्र पुण्यात‘मराठवाडा रत्न’ पुरस्काराचे वितरण 

 पुण्यात‘मराठवाडा रत्न’ पुरस्काराचे वितरण 

 पुणे : प्रतिनिधी-
एकी काळी मराठवाडा संपन्न होता. मात्र,येथील माणसांची मागे राहण्याची वृत्ती नडली. ही वृत्ती बदलून विजिगिषु वृत्तीने संघर्ष करत मराठवाड्याला पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याचे आव्हान स्वीकारा, असे डेक्कन अभिमत विद्यापीठाचे माजी कुलपती, ज्येष्ठ विचारवंत आणि मूर्तीशास्त्राचे अभ्यासक, संशोधक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी सांगितले.
मराठवाडा सेवक प्रतिष्ठानतर्फे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त राज्यस्तरीय ‘मराठवाडा रत्न’ पुरस्कार वितरण सोहळा येथे आयोजित करण्यात आला होता.  डॉ. देगलूरकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय विमुक्त-भटक्या व अर्ध भटक्या जमाती विकास मंडळाचे अध्यक्ष पद्मश्री भिकुजी दादा इदाते यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. मराठवाडा मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मराठवाडा सेवक संघाचे अध्यक्ष दिनकर चौधरी, उपाध्यक्ष दिनेश सास्तूरकर, सचिव गणेश चौधरी, विवेक जाधव, दत्तात्रय शिंदे व्यासपीठावर होते. यावेळी खंडेराव कुलकर्णी (शिक्षकरत्न पुरस्कार), रमेश अंबरखाने (उद्योगरत्न पुरस्कार), प्रदीप नणंदकर, (आदर्श पत्रकारिता पुरस्कार), रमाकांत जोशी (आरोग्य रत्न पुरस्कार), धनंजय गुडसूरकर (साहित्यरत्न पुरस्कार), सुधाकर जाधवर (शिक्षणरत्न पुरस्कार), मंगेश बोरगावकर (संगीतरत्न पुरस्कार), दिनेश वैद्य (औद्योगिक सुरक्षा पुरस्कार), गौतम बनसोडे (उद्योगरत्न पुरस्कार), संदीप पंचवाटकर (कलारत्न पुरस्कार), परमेश्वर पाटील (उद्योगरत्न पुरस्कार) यांचा ‘मराठवाडा रत्न ’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.
मराठवाडा सेवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर चौधरी यांनी प्रास्ताविक केले. शिल्पा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. दिनेश सास्तूरकर यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. रमेश सूर्यवंशी यांनी आभार मानले. मंगेश बोरगावकर यांनी ‘महाराष्ट्र भूमी ही कर्मभूमी’ हे गीत सादर केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR