पालम : राज्य शासनाने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यात लाडक्या बहिणीला १५०० रूपये प्रति महिना देण्यात येत आहे. लाडकी बहीण आनंदी झाली असून त्यात आणखी एक भर म्हणजे वर्षाला ३ मोफत सिलेंडर देण्याची घोषणा केली होती. योजना बहिणीसाठी असली तरी सिलेंडर दाजीच्या नावावर असल्याने याचा मेळ कसा बसणार व लाडक्या बहिणीला मोफत सिलेंडर मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शासनाने मोफत सिलेंडरची घोषणा केली असून आज पर्यंत लाडक्या बहीणीला ५ हत्याचे अनुदान ही मिळाले आहे तर काहींना प्रतीक्षा करावी लागत आहे. या योजनेतील ३ सिलेंडरच्या प्रतीक्षेत बहीण वाट पाहत आहेत. मात्र मोफत सिलेंडरचे नियम काय? ते कसे मिळणार? हे मात्र सध्या गुलदस्तात दिसत आहे.
आता सणासुदीच्या दिवसाला सुरुवात झाली आहे. सणासुदीचे दिवस तोंडावर येताच सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीला सिलेंडरची मात्र प्रतीक्षा मोठ्या प्रमाणात आहे.
दिवाळीसाठी भाऊबीजेची भेट म्हणून लाडक्या बहिणीला सिलेंडर मिळणार का वाट पाहत बसावी लागेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. योजना बहिणीसाठी असली तरी सिलेंडर मात्र दाजीच्या नावावर असल्याने याचा मेळ कसा बसणार.
यात शासनाने काय मार्ग काढणार असा सवाल लाडक्या बहिणीला पडत आहे. यासाठी सरकारने मार्ग काढणे आवश्यक आहे. मोफत सिलेंडरचा लाभ दिवाळीला मिळेल काय असा सवाल मात्र बहिणीला पडला आहे.