अतिदक्षता विभागात उपचार
मुंबई : प्रतिनिधी
प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा कंपनीचे सर्वेसर्वा रतन टाटा यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक असून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रतन टाटा यांना काही दिवसांपूर्वीच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सध्या ब्रीच कँडी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत आहेत.
याआधी ७ ऑक्टोबर २०२४ रोजी रतन टाटा यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आले होते. तेव्हा रतन टाटा यांना रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान रुग्णालयात देण्यात आले होते. रतन टाटा याचा रक्तदाब कमी झाला होता आणि त्यांना तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील एक्सपर्ट डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी स्वत: रतन टाटा यांनी एक्सवरून आपल्या प्रकृतीची काळजी करण्याची काही कारण नसल्याचे स्पष्ट केले होते. वय आणि प्रकृतीबाबत काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. वयानुसार नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आल्याचे त्यांनी म्हटले. मेडिकल चेकअपसाठी भर्ती करण्यात आली असून माझ्या प्रकृती संदर्भात अफवा पसरवल्या जात आहेत, असे रतन टाटा यांनी पोस्टमध्ये म्हटले होते.