26.4 C
Latur
Wednesday, November 27, 2024
Homeमहाराष्ट्रकर्तृत्ववान उद्योजक गमावला : राज ठाकरे

कर्तृत्ववान उद्योजक गमावला : राज ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी
प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांचे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात बुधवारी निधन झाले आहे. वयाच्या ८६व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे देशाचे मोठे नुकसान झाले असून देशभरात शोककळा पसरली आहे. उद्योग क्षेत्रासह राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील दिग्गजांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे. ‘आज मी एक ज्येष्ठ मित्र गमावला याचे दु:ख आहेच, पण एकूणच भारताने कदाचित शेवटचा असा ‘कर्तृत्ववान तरीही निर्लेप राहिलेला उद्योजक गमावला, हे त्याहून मोठे दु:ख.’ असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी श्रध्दांजली वाहिली आहे.

राज ठाकरे यांनी ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. रतन टाटा यांचे निधन झाले. जवळपास १५६ वर्षांची परंपरा असलेल्या एका उद्योग समूहाला ज्यांनी ख-या अर्थाने एकविसाव्या शतकात आणले आणि ‘टाटा’ ही नाममुद्रा ज्यांनी जगभर नेली ती रतन टाटांनी. बरे, हे सगळे करताना एखाद्या योगी माणसाची स्थितप्रज्ञताच ठेवायची ही टाटा समूहाची शिकवण पूर्णपणे अंगीकारायची हे खरंतर कठीण, पण ते रतन टाटांना जमले.

‘‘माझे आणि रतन टाटांचे व्यक्तिगत जिव्हाळ्याचे संबंध होते आणि मी एखादी कल्पना त्यांच्यापुढे मांडली आणि रतन टाटांनी त्याला प्रतिसाद दिला नाही असे कधीच झाले नाही. आम्ही मांडलेल्या महाराष्ट्राच्या विकास आराखड्याबाबत त्यांनी केलेल्या सूचना असोत की नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्तेच्या काळात उभारलेल्या ‘बोटॅनिकल उद्याना’साठी सीएसआरमधून दिलेला निधी असो, त्यांचा माझ्याबद्दलचा आणि पक्षाबद्दलचा जिव्हाळा अनेकदा दिसून आला.’’

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR