22.8 C
Latur
Saturday, December 21, 2024
Homeमहाराष्ट्रप्रवीण लोणकरला अटक

प्रवीण लोणकरला अटक

बाबा सिद्दीकी यांच्या खुनाप्रकरणी आणखी एका आरोपीस अटक

पुणे : बाबा सिद्दीकी खुनाप्रकरणी प्रवीण लोणकर या २८ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. प्रवीण लोणकर हा शुभम लोणकर याचा भाऊ असून त्याला पुण्यातून अटक केली आहे.

धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम या दोघांनी बाबा सिद्दीकी यांच्या खुनाचा कट रचला होता. हा कट रचण्यात शुभम लोणकर आणि प्रवीण लोणकरचाही सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिस या प्रकरणी पुढील चौकशी करत आहेत.

माजी आमदार आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची वांर्द्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे तर एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR