19.9 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्र‘लाडकी बहीण’च्या जाहिरातीमधून ‘मुख्यमंत्री’ वगळले

‘लाडकी बहीण’च्या जाहिरातीमधून ‘मुख्यमंत्री’ वगळले

महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई

मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीआधी एकीकडे महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याची कुजबूज सुरू असताना भाजपच्या जाहिरातीमधून मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नावच नसल्याचे समोर आले, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना जास्त जोर आला आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या जाहिरातींमध्ये तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सगळीकडे दिसले.

दरम्यान, आचारसंहितेपूर्वी महायुतीची जोरदार जाहिरात बाजी केली आहे. ‘लाडकी बहिण योजने’वरून महाविकास आघाडीला डिवचले आहे. महाराष्ट्रात लाडकी बहिण योजना यशस्वी झाल्याच्या जाहिराती सगळीकडे प्रसिद्ध झाली. महाविकासआघाडीने मात्र विविध राज्यांत फसवल्याचा आरोप यावेळी जाहिरातीतून करण्यात आली. तेलंगणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, झारखंडमध्ये आघाडीने फसवल्याचा आरोप जाहिरातीत केल्याचे दिसत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो अगदी छोटा कोप-यात दिसला. महायुती शासित महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना यशस्वी अशी जाहिरात सगळीकडे लावण्यात आली आहे. तर सगळ्या जाहिरांमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो मात्र अगदी लहान आणि त्यांचा उल्लेख नसल्यानं राजकीय वर्तुळा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

आघाडीने तेलंगणात २,५०० आणि हिमाचल प्रदेशमध्ये १५०० रुपये देण्याची थाप मारली असा आरोप जाहिरातीत केला आहे. कर्नाटकातही अंगणवाडी व आशा सेविकांना वाढीव मानधनाच्या नावाने गंडविले. झारखंडमध्ये बिनव्याजी २ हजार रुपये दिलेच नाहीत. महाराष्ट्रात महायुतीने लाडकी बहिण योजनेचे ४ हफ्ते दिल्याची जाहिरात बाजी केली आहे.

विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोग आज महत्त्वाची घोषणा दुपारी ३.३० वाजता करणार आहे. तुळशी विवाहानंतर विधानसभा निवडणूक होईल असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेशी संवाद साधताना म्हटले आहे. विधानसभेसाठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR