27.6 C
Latur
Friday, November 22, 2024
Homeपरभणीश्री संत सेवालाल महाराज, माता जगदंबा देवी मंदिर भूमिपूजन उत्साहात

श्री संत सेवालाल महाराज, माता जगदंबा देवी मंदिर भूमिपूजन उत्साहात

जिंतूर : श्री संत सेवालाल महाराजांच्या विचारांनी प्रभावित झालेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव सुरेश नागरे यांनी श्री संत सेवालाल महाराजांच्या आणि आई जगदंबा देवीच्या मंदिरासाठी पुढाकार घेतला आहे. आज त्याच मंदिरांचा भूमिपूजन सोहळा मालेगाव तांडा, खडकपाटी येथे पार पडला.

या कार्यक्रमाला संत बाबू सिंग महाराज महंत पोहरादेवी, संत ज्ञानेश्वर माऊली महाराज मठाधिपती श्री क्षेत्र अमरगड, संत विनोद महाराज टोकवाडीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सुत्रसंचालन प्रा. विजय जाधव यांनी केले. काँग्रेस सचिव नागरे यांच्या अध्यक्षतेत हा सुवर्ण सोहळा पार पडला. या प्रसंगी लक्ष्मीताई राठोड, अमित राठोड, राजेश चव्हाण, प्रसादराव बुधवंत, बाबूसिंग महाराज यांनी मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी काँग्रेस सचिव नागरे म्हणाले की, यापूर्वी जिंतूर तालुक्यातील राजकारण्यांनी बंजारा समाजाचा वापर फक्त मतदानापुरता केला आहे. परंतु मी कुठल्याही पदावर नसताना आज श्री संत सेवालाल महाराज व आई जगदंबा देवीचे मंदिर बांधण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही दिली.

यावेळी सौ.अमृता नागरे, लक्ष्मीताई राठोड, मीनाताई राऊत, अरुणाताई काळे, कमलताई लोखंडे, नानासाहेब राऊत प्रसादराव बुधवंत, अविनाश काळे, राजेश चव्हाण, अमित राठोड, विनायक आडे, कृष्णा महाराज, प्रेम राठोड, राजेंद्र नागरे, केशवराव बुधवंत, लहू आडे, सचिन राठोड, विष्णू जाधव, अनंतराव कोरडे, रमेश आडे, राम घुगे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. विजय जाधव यांनी केले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR