बोरी : येथील कै जयकुमारजी जैन सार्वजनिक वाचनालयात दि.१५ ऑक्टोबर रोजी भारतरत्न माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे माजी केंद्रप्रमुख तथा प्रवचनकार साहेबराव कौटकर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी वाचनालयाच्या अध्यक्षा सौ. मीना जैन यांची उपस्थिती होती.
प्रारंभी भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी रूपाली बुलबुले उपस्थित होत्या. प्रास्ताविक ग्रंथपाल नेमीनाथ जैन यांनी केले. यावेळी जगदीश सुकळे, वैभव जाधव, कार्तीक गायकवाड, विराट गायकवाड, विनायक चैन, कृष्णा नरवडे, अथर्व सुकळे, सार्थक माळी, श्रद्धा चौधरी, अर्जिता वैद्य, दिपाली चौरे, गितांजली चौरे या बालवाचकांचा ग्रंथभेट व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. बालवाचकांसाठी विनामुल्य सभासद योजना चालु असुन हजारो बालसाहित्य उपलब्ध आहे. याचा लाभ घेऊन आपली बौद्धीक क्षमता पुस्तके वाचुन वाढवावी असे आवाहन सेवानिवृत्त केंद्रप्रमुख कौटकर यांनी यावेळी केले.