सोनपेठ/प्रतिनिधी
२४ वर्षापुर्वी दुरदृष्टीच्या विचाराने दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नातून व अशोकशेठ सामत यांच्या मार्गर्शनाखाली योगेश्वरी साखर कारखाना उभारला गेला असून कारखान्याच्या माध्यमातून शेतक-यांचे नेहमी हीत जोपासण्याचा प्रयत्न असल्याचे माजी आमदार तथा कारखान्याचे विद्यमान चेअरमन आर.टी.देशमुख यांनी व्यक्त केले.
योगेश्वरी शुगरच्या २३व्या बॉयलर अग्नीप्रदीपन कार्यक्रमाचे दि.१६ ऑक्टोंबर रोजी कारखाना कार्यस्थळावर आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा थाटात पार पडला. यावेळी पुढे बोलताना देशमुख यांनी सांगितले आमच्या कुटुंबाला लोकसेवेचा वारसा असून आम्ही ज्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करत आहोत त्या नेतृत्वाने देखील लोकसेवा हीच शिकवण आम्हाला दिली आहे. या सामाजिक सेवेचा समग्र वारसा आम्ही आमच्या माध्यमांतून चालवणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
या अग्नी प्रदिपन कार्यक्रमाचे पौरोहित्य यज्ञेश्वर गुरू सेलुकर, अतुलगुरू खांडवीकर यांनी केले. यज्ञपूजा सौ.उत्कर्षा रोहीत देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाली. या प्रसंगी कारखान्याचे चेअरमन आर.टी.देशमुख व त्यांच्या पत्नी सौ.कुंदाताई देशमुख, कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर अॅड. रोहीत देशमुख व त्यांच्या पत्नी सौ.उत्कर्षा देशमुख, कारखान्याचे डायरेक्टर राहुल देशमुख, डॉ.अभिजीत देशमुख, कारखान्याचे प्रमोटर लक्ष्मीकांतराव घोडे, गंगाधरराव गायकवाड, सुदामराव सपाटे, कारखान्याचे जनरल मॅनेजर प्रकाश चांदगुडे, कामगार अधिकारी श्रीहरी साखरे, मुख्य रसायनतज्ञ नवनाथ चौधरी, प्रशासन अधिकारी राजकुमार तौर, केन मॅनेजर चंद्रकांत मुखरे, उपअभियंता आढाव, मुख्य लेखापाल मुकेश रोडगे, कामगार अधिकारी रामराव कदम, भांडारपाल नंदीप भंडारे, सुरक्षा अधिकारी गणेश वाघमारे, माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण दुगाने शिवसेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत तीडके, लिंबा सोसायटी चेअरमन बालासाहेब सहजराव, बाबुराव दळवे, मंकाजी शिंदे, प्रगतिशील ऊस उत्पादक कार्तिक घुबरे, सुधाकर आरबाड, पत्रकार सिद्धेश्वर गिरी, मधुसूदन यादव, मोहनराव देशमुख, कल्याणराव देशमुख, वसंत लाखे, अमोल देशमुख, सुग्रीव तिडके व कामगार कर्मचारी ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड वाहतूक, ठेकेदार आदींची उपस्थिती होती.