15.2 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeमहाराष्ट्रठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींना अटक

ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींना अटक

मुंबई : भरसभेत मुख्यमख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ करणं दत्ता दळवी यांना भोवलं आहे. दत्ता दळवी यांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे. भूषण पलांडे यांच्या तक्रारीनंतर भांडुप पोलिसांनी माजी महापौर दत्ता दळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

भा.द.वि कलम १५३(अ),१५३ (ब),१५३ (अ) (1)सी, २९४, ५०४ , ५०५ (१)(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आता दत्ता दळव यांना अटक करण्यात आली आहे. या संदर्भातच संजय राऊत भांडुप पोलीस स्टेशनला जाणार आहेत. त्यावेळी ते प्रसार माध्यमांशी संवाद साधणार आहेत.

भांडूप पोलिस स्टेशनबाहेर ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले आहेत. कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनबाहेर जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. खासदार संजय राऊत आणि आमदार सुनिल राऊत पोलिस स्टेशनमध्ये पोहचले आहेत. दत्ता दळवींना अटक का केली ? असा जाब पोलिसांना राऊत विचारणार आहेत. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी चर्चा करतील.
भांडूप मध्ये रविवार (दिनांक २६ नोव्हेंबर) शिवसेना ठाकरे गटाचा कोकणवासीय पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा होता.

या मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर, उपनेते दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आपत्तीजनक वक्तव्य केले होते. त्यामुळे आज सकाळी आठ वाजता भांडुप पोलिसांनी त्यांना विक्रोळी येथील राहत्या घरातून अटक केली आहे. आज त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

शिवसेना उबाठा गटातर्फे रविवारी भांडुपमध्ये ईशान्य मुंबईत राहणा-या कोकणवासियांचा जाहीर मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या ‘हिंदुह्रदयसम्राट’ या उपमेवरून माजी महापौर दत्ता दळवी यांनी शिवीगाळ केली.

दळवींना १२ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी अटक केली आहे. त्यांनी आज न्यायालयात हजर करण्यात आले. दळवींना १२ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR