30.6 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रमाजी महापौर दत्ता दळवींना दिलासा; जामीन मंजूर

माजी महापौर दत्ता दळवींना दिलासा; जामीन मंजूर

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत अपशब्द वापरल्या प्रकरणी माजी महापौर दत्ता दळवींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली. आता या प्रकरणी त्यांना दिलासा मिळाला आहे. दत्ता दळवी यांना जामीन मंजूर करण्यात आला असून मुलूंड न्यायालयाने दत्ता दळवी यांना जामीन मंजूर केला आहे. १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली. आरोपी वरिष्ठ नागरिक असून त्यांना काही आजार देखील आहेत. तसेच ते पळून जाण्याची भीती नाही म्हणून जामीन मंजूर करण्यात आल्याचे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रकरणाचा तपास संपण्यापर्यंत काही प्रतिबंध लागू असणार आहेत. त्यांना मुख्यमत्र्यांविरोधात कोणतेही अवमानकारक वक्तव्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचे प्रक्षोभक वक्तव्य करण्यास मनाई, पोलिसांना सहकार्य करण बंधनकारक असणार आहे. कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये, याची काळजी घेणे बंधनकारक असणार आहे.

दत्ता दळवी आक्रमक स्वभावामुळे ते अल्पावधीतच पुढे आले आणि बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू बनले. शिवसेनेच्या विभाग क्रमांक ७ च्या विभागप्रमुखपदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. तसेच २००५ ते २००७ या दरम्यान दत्ता दळवींनी मुंबईचे महापौर म्हणून काम केले. या काळात त्यांनी आपली कारकीर्द चांगलीच गाजवली. ईशान्य मुंबईमध्ये दत्ता दळवींचा मोठा प्रभाव आहे. एकनाथ शिंदेंनी बंड केले आणि शिवसेनेवर दावा सांगितला. त्या काळात दत्ता दळवींनी उद्धव ठाकरेंसोबत राहून त्यांची निष्ठा कायम ठेवली. आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच शिवी दिल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR