लातूर : प्रतिनिधी
शहरातील दयानंद गेट परिसरात दि. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी कोत्याने वार करुन खुन करणा-या दोघा भावांसह आईला धाराशिव येथील वडार गल्लीतून स्थानिक गुन्हे अन्वेषण व शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली. घरगुती काराणवरुन शिवाजी उर्फ अनिल त्र्यंबक देवकर याचा अजय सुनिल मुद्दे व कृ्ष्णा सुनिल मुद्दे या सख्या भावांनी त्यांच्या आईने कोयत्याने वार करुन भर रस्त्यात गुरुवारी सकाळी खुन केला होता. या घटनेनंतर तिघेही संशयीत आरोपी फरार झाले होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व शिवाजीनगर पोलीसांच्या संयुक्त पथकाने मोठ्या शिताफिने कारवाई करुन तिघांनाही धाराशिव येथील वडार गल्लीतून अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे. अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.
ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गु्न्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वाखाली पथकातील पोलीस अंमलदार युवराज गिरी, राहूल सोनकांबळे, अर्जुन राजपूत, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार काकासाहेब बोचरे, महिला पोलीस अंमलदार साधना सूर्यवंशी यांनी केली.