17.5 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeपरभणीविवाद से विश्वास योजनेचा कारदात्यांनी लाभ घ्यावा : मुख्य आयकर आयुक्त रीना झा

विवाद से विश्वास योजनेचा कारदात्यांनी लाभ घ्यावा : मुख्य आयकर आयुक्त रीना झा

परभणी : केंद्रीय अर्थ संकल्पात कर कारदात्यासाठी केंद्र सरकारने विवाद से विश्वास योजना आनली आहे. याचा कारदात्यानी मोठया प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य आयकर आयुक्त रीना झा त्रिपाठी यानी केले आहे.

या योजनेचा आढ़ावा घेन्यासाठी शुक्रवार, दि.१८ ऑक्टोंबर रोजी चर्चा सत्राचे आयोजन नांदेड़ आयकर विभाग आयकर कार्यालय येथे करण्यात आले होते. यात मुख्य आयकर आयुक्त रीना झा त्रिपाठी यानी मार्गदर्शन केले. पुढे बोलीताना मुख्य आयकर आयुक्त रीना झा त्रिपाटी म्हणाल्या की, या योजनेचा लाभ घेऊन अपील मधिल करदाते कमी कशे होतील या बाबत मार्गदर्शन केले. कर सल्लागार व चार्टर अकाउंटेंट हे व्यापारी व करदाता यांच्यात जागरूकता कशी निर्माण होइल याबाबत कार्य करतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

यावेळी अतिरिक्त आयकर आयुक्त भारत जोंधळे, करदाते, व्यापारी कर सल्लागार चार्टर अकाउंटेंट, आयकर अधिकारी मोठया संखेने उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर मुख्य आयकर आयुक्त रीना झा त्रिपाठी, अतिरिक्त आयकर आयुक्त, आयकर अधिकारी, कर सलागार, सीए यांनी स्वछता अभियान राबवून स्वेच्छतेचा संदेश दिला. या स्वच्छता अभियानाने नांदेडकरांचे लक्ष वेधून घेतले होते.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR