28.6 C
Latur
Monday, April 21, 2025
Homeमहाराष्ट्रदत्तात्रय भरणेंविरोधात महिलांचा आक्रोश, साड्या फेकल्या रस्त्यावर

दत्तात्रय भरणेंविरोधात महिलांचा आक्रोश, साड्या फेकल्या रस्त्यावर

इंदापूर : विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर इंदापूरमध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांचा फोटो असलेल्या पिशव्यामधून तालुक्यांमध्ये साड्यांचे वाटप करण्यात आले. परंतु, इंदापूर तालुक्यातील कळंब या गावातील घोडके वस्तीवरील महिलांनी साड्या रस्त्यावरती फेकून दिल्या. आम्हाला विकास हवाय साड्या नको असे म्हणत निषेध व्यक्त केला. तसेच साड्या देऊन आमची मते विकत घेता का? असा सवाल महिलांनी विचारला आहे. गेल्या काही दिवसापासून इंदापूर तालुक्यात खेळ पैठणीच्या माध्यमातून भरणे साड्या वाटप करीत असल्याचा आरोप केला जातो.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याचे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आमदार दत्तात्रय भरणे हे शुक्रवारी २५ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. सातत्याने पाच वर्ष मी माणसांमध्ये त्यांची कामे सोडवण्यासाठी जात असतो. त्यामुळे मला टेन्शन येत नाही. मी कधीही टेन्शन घेत नाही. मला निवडणुकीची भीतीही वाटत नाही असेही आमदार भरणे यांनी म्हटले आहे. दरम्यान, यावेळी अजित पवार इंदापुरात दोन सभा घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक २०१४ प्रत्येक पक्षाने स्वबळावर लढली होती. त्यावेळी इंदापुरात राष्ट्रवादीकडून दत्तात्रय भरणेंना मैदानात उतरवण्यात आले होते. तर काँग्रेस पक्षाकडून हर्षवर्धन पाटालांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत दत्तात्रय भरणेंना १०८४०० मते मिळाली होती तर हर्षवर्धन पाटलांना ९४२२७ मतांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांचा जवळपास १६ हजार मतांनी पराभव झाला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR