रेणापूर : प्रतिनिधी
‘आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा ‘ या म्हणी प्रमाणे रुग्णांच्या सेवेसाठी आता लातूर जिल्ह्यातील लातूर, उदगीर वगळता डायलिसिसची सुविधा ही केवळ रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध झाली असून याचा शुभारंभ नुकताच शुक्रवारी (दि १८) प्रथम उपचार घेण्यासाठी आलेल्या बीड जिल्हयातील नंदागवळ येथील रहिवाशी गोंिवद गित्ते यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. या वेळी तालुका आरोग्य अधिकारी श्रीधर रेड्डी,जेष्ठ, पत्रकार विठ्ठल कटके, डॉ.बी एन बरेवार, आर .डी .आपंिसगेकर यांची उपस्थिती होती.
रेणापूर तालूक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांच्या सेवेसाठी २४ तास आरोग्य सेवेसाठी कार्यरत असलेले रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात अनेक सेवा दिल्या जातात परंतु यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून डायलिसिसची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे तालूक्यातील अनेक डायलीसिसच्या रुग्णांना बाहेरगावी मोठ्या शहरात जाऊन पैसे देऊन उपचार करुन घ्यावे लागत होते. ग्रामीण भागातील रुग्णांना याचा फायदा व्हावा म्हणून ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक ए. बि आलगुले यांनी या ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस मशीन उपलब्ध व्हाव्यात म्हणून सतत वरीष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरु केला गेल्या दोन वर्षापासून केलेल्या पाठपुराव्याने अखेर यश आले असून या ग्रामीण रुग्णालयात एकूण पाच मशीन उपलब्ध झाल्या आहेत याचा शुभारंभ नुकताच शुक्रवारी (दि. १८) करण्यात आला.
ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध झालेल्या पाच मशीनच्या माध्यमातून दिवसात किमान १० रुग्णांना सेवा देता येते. एका रग्णाला एका वेळेस डायलिसिस करण्याचा खर्च जवळपास दीड हजार ते दोन हजार रुपयांपर्यंत येतो परंतु आता रेणापुरात उपलब्ध झालेले हे डायलिसिस अनेक रुग्णांना महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत हा उपचार मोफत दिला जाणार आहे. तालुक्यात पानगाव खरोळा, कारेपूर, बिटरगाव, पोहरेगाव या पाच आरोग्य केंद्रातून दररोज जवळपास सहाशे रुग्णांना उपचार दिला जातो. या पाच आरोग्या केंद्राच्या परिसरात जे डायलिसिसचे रुग्ण असतील तर त्यांनी ग्रामीण रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या डायलीसिस सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामिन रुग्णालयाच्या वैद्यकीय अधक्षिक ए. बी अलगुले यांनी केले आहे.