लातूर : प्रतिनिधी
लातूर ग्रामीण मतदारसंघातील अंकोली (ता. लातूर) येथील उपसरपंच सुधाकर गवळी, बाळकृष्ण उर्फ विकास मुळे, गणेश गवळी यांच्यासह त्यांचे सहकारी, कार्यकर्ते यांनी लातूर येथे लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत रविवारी, दि. २० ऑक्टोबर रोजी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार धिरज देशमुख यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी विजय देशमुख, सर्जेराव मोरे, किरण जाधव, जगदीश बावणे, रंिवद्र काळे, शाम भोसले, संतोष देशमुख, सुभाष घोडके, प्रमोद जाधव, अनंतराव देशमुख, उमाकांत खलंग्रे, गुरुनाथ गवळी, अनुप शेळके, गोंिवद बोराडे, राजेसाहेब सवई, मदन भिसे, युवराज जाधव, सचिन दाताळ, प्रताप पडिले, श्रीनिवास शेळके, तुकाराम गोडसे पाटील, महेंद्र भादेकर, कैलास पाटील, रघुनाथ शिंदे, संजय गवळी, महेंद्र मुळे, दीपक गवळी, मदन नागमोडे, विशाल चव्हाण आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.