सोलापूर : मी आतापर्यंत अनेक शिखरावरती चढाई केली आहे. अशा प्रकारची चढाई करत असताना मला माझे मित्र विचारायचे की तुला भीती वाटत नाही का तर त्यांच्या प्रश्नाचे माझ्याकडे सोपं उत्तर होते मला जर दिसलं तर त्याची भीती वाटेल आणि मला तर दिसतच नाही मग भीती कसली. आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाने दृष्टिकोन बदलला तर दृष्टीची आवश्यकता लागत नाही. अंदाजे मी अपंग आहे म्हणून दुसऱ्यावर अवलंबून राहता प्रत्येकाने काम शोधण्यापेक्षा काम देणारे हात निर्माण करणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रपती पदक प्राप्त अंध उद्योजक भावेश भाटिया यांनी व्यक्त केले.
प्रिसिजन फाऊंडेशनच्य वतीने आयोजित केलेल्या प्रिसिजन गप्पांमध्ये उद्योजक भाटिया बोलत होते. प्रिसिजन फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्याच्या वितरण प्रसंगी मुलाखतकार अनघा मोडक यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी मीनाक्षी निकम दीक्षा दिंडे हे बोलत होते.
यावेळी चाळीसगाव, जळगाव येथील स्वयंदीप संस्थेला या वर्षीचा प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार (३ लाख रुपये व सन्मानचिन्ह) तसेच दिव्यांग दीक्षा दिंडे यांना स्व. सुभाष रावजी शहा स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. (दोन लाख रुपये व सन्मानचिन्ह) रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते. डॉ. भावेश भाटिया यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले. यावेळी प्रिसिजन समूहाचे चेअरमन यतिन शहा, प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा व संचालक रवींद्र जोशी हे उपस्थित होते.