जळगाव : सोन्याच्या दराने आज बुधवारी उच्चांक गाठला. आज शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६२,७७५ रुपयांवर पोहोचला. कालच्या तुलनेत आज सोने ८६२ रुपयांनी महागले. तर चांदीच्या दरात ८६१ रुपयांनी वाढ होऊन दर प्रति किलो ७५,७५० रुपयांवर गेला.
दरम्यान, एमसीएक्सवर सोने फेब्रुवारी फ्यूचर्स प्रति १० ग्रॅम ६२,९३४ रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले. कमकुवत झालेल्या डॉलर निर्देशांकामुळे बाजारात सोन्याला झळाळी मिळाली आहे. डॉलर निर्देशांक सध्या तीन महिन्यांच्या निचांकी पातळीवर व्यवहार करत आहे आणि तो १०३ अंकाच्या खाली आला.
फेब्रुवारी गोल्ड कॉन्ट्रॅक्ट दुपारी १२ च्या सुमारास प्रति १० ग्रॅम ६२,८०० रुपयांवर होते. सर मार्च सिल्व्हर फ्यूचर्स प्रति किलो ७६,९९६ रुपयांवर होते. फ्यूचर मार्केटमध्ये सोने ६२,७२२ रुपयांवर बंद झाले होते.
इंडिया बुलिया अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ६२,७७५ रुपये, २३ कॅरेट सोने ६२,५२४ रुपये, २२ कॅरेट ५७,५०२ रुपये, १८ कॅरेट ४७,०८१ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर ३६,७२३ रुपयांवर खुला झाला आहे. तर चांदीचा दर प्रति किलो ७५,७५० रुपयांवर खुला झाला आहे.