20.4 C
Latur
Friday, December 27, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी अनिल गायकवाड

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी अनिल गायकवाड

राधेश्याम मोपलवार यांना हटवले

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाच्या खांदेपालटावर सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचे नवे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड हे असणार आहेत. वादग्रस्त व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना अखेर पदावरुन हटवले आहे. मोपलवार हे राज्यात चर्चेचा आणि कुतुहलाचा विषय होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोपलवार यांना पदावरुन हटवले आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाच्या खांदेपालटावर सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. राज्य सरकारच्या या महत्वाकांक्षी मंडळाच्या प्रमुखपदाची सूत्रे आता राधेश्याम मोपलवार यांच्याकडून अनिल गायकवाड यांच्या हाती सोपवण्यात आली आहेत.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उध्दव ठाकरे मुख्यंमंत्रीपदाच्या काळात मोपलवार यांना कायम स्थान मिळत होते. मंडळांचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार यांनी २०१८ मधील निवृत्ती नंतरही रेकॉर्ड ब्रेक सात वेळा आपली कालमर्यादा वाढवून घेतली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR