मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती उपाध्यक्षा आणि प्रदेश प्रवक्त्या सना मलिक – शेख या अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असून २३ ऑक्टोबरला अजित पवार गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आलाय. इच्छुक, मग इच्छुकांना उमेदवारी मिळण्याची शक्यता मावळल्यानं नाराजी, मग नाराजीतून दुसरे पर्याय शोधणं, ऐनवेळी पक्ष बदलणं अशा नाना घटना दर तासाला घडताना दिसत आहेत.
अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असून या मतदारसंघाचे माजी मंत्री नवाब मलिक यांनी नेतृत्व केले आहे. मतदारसंघावर मजबूत पकड असलेल्या नवाब मलिक यांनी हा मतदारसंघ मुलगी सना मलिक – शेख यांच्यासाठी सोडला आहे.
आजपासून, २२ ऑक्टोबरपासून अर्ज भरलायला सुरुवात झाली असून, २० नोव्हेंबरला मतदान आणि दोनच दिवसात म्हणजे २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. राज्याच्या राजकारणात सत्ताधारी महायुती आणि विरोधक महाविकास आघाडी यांच्यासोबतच परिवर्तन महाशक्ती नावाची तिसरी आघाडीही मैदानात उतरली आहे. याशिवाय, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी असे काही पक्षही मैदानात आहेत.