मुंबई : महायुतीकडून आतापर्यंत १८२ उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीतील राजकीय पक्षांकडूनही उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप सुरू केले आहे. शिवसेना युबीटी पक्षाने माहीम मतदारसंघातून शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर केला आहे.
येथील मतदारसंघातून अमित ठाकरेंविरुद्ध उद्धव ठाकरेंकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर, इतरही मतदारसंघातील नेतेमंडळी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेत आहे. त्यामुळेच, शिवसेना ठाकरे गटाकडून नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात गुन्हा दाखल झाल्यामुळे चर्चेत असलेल्या शिवसेनेच्या सुधाकर बडगुजर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यासह, वसंत गितेंनाही ठाकरेंनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
यादी
१. सुधाकर बडगुजर(नाशिक पश्चिम)
२. वसंत गिते(नाशिक मध्य)
३. अद्वय हिरे (मालेगाव बा )
४. एकनाथ पवार (लोहा कंधार)
५. के पी पाटील, राधानगरी विधानसभा
६. बाळा माने, रत्नागिरी विधानसभा
७. अनुराधा नागवडे, श्रीगोंदा विधानसभा
८. गणेश धात्रक, नांदगाव
९. उदेश पाटेकर, मागाठाणे विधानसभा
१०. अमर पाटील, सोलापूर दक्षिण
११. दीपक आबा साळुंखे पाटील, सांगोला