21.4 C
Latur
Wednesday, October 23, 2024
Homeमहाराष्ट्रकोपरगावमध्ये पहिल्यांदाच कोल्हे घराण्याची माघार

कोपरगावमध्ये पहिल्यांदाच कोल्हे घराण्याची माघार

कोपरगाव : विशेष प्रतिनिधी
महायुतीत कोपरगाव हा मतदार संघ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेला आहे. इथे अजित पवारांनी आशुतोष काळे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मतदार संघात काळेंचे कट्टर विरोधक समजले जाणा-या कोल्हे कुटुंबीयांचा हिरमोड झाला. कोल्हे कुटुंब सध्या भाजपमध्ये आहे. महायुतीचा धर्म म्हणून कोल्हे कुटुंबाला निवडणुकीच्या रिंगणात उतरता येणार नाही. तशी घोषणाच माजी आमदार स्रेहलता कोल्हे यांनी केली. त्यामुळे अनेक वर्षांनी पहिल्यांदाच कोपरगावच्या निवडणूक आखाड्यात कोल्हे-काळे संघर्ष पाहायला मिळणार नाही.

कोपरगाव विधानसभा मतदार संघ म्हटला म्हणजे कोल्हे घराणे विरुद्ध काळे घराणे हा संघर्ष समोर येतो. एका पिढीतून दुस-या पिढीत हा संघर्ष होत आला आहे. शंकरराव काळे आणि शंकरराव कोल्हे यांचा संघर्ष या मतदार संघाने पाहिला आहे. मतदारांनी कधी काळे घराण्याला संधी दिली तर कधी कोल्हे घराण्याला कौल दिला. निवडणूक म्हटली म्हणजे ही दोन घराणी आमने सामने उभी ठाकलेली असायची. मात्र त्याला २०२४ ची निवडणूक अपवाद ठरणार आहे.

या विधानसभा निवडणुकीत काळे घराणे निवडणुकीच्या रिंगणात असेल. महायुतीकडून आशितोष काळे हे मैदानात आहेत. याबाबत भाजपच्या माजी आमदार स्रेहलता कोल्हे यांनी एक भावनिक संदेश फेसबुकच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यात त्या म्हणतात आपला तीन पिढ्यांचा ऋणानुबंध असून कधी कधी दोन पावले मागे येणे म्हणजे दहा पावले पुढे जाण्यासाठी घेतलेली भुमिका असते. आपण भाजप सोबत एकनिष्ठ असून धोका देवून पुढे जाण्याची भूमिका आपली नाही, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR