19.3 C
Latur
Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्रमविआचं ठरलं, महायुतीचे ठरेना

मविआचं ठरलं, महायुतीचे ठरेना

मविआत २७० जागांवर एकमत तिन्ही पक्षांना प्रत्येकी ८५ जागा, उर्वरित जागांवर आज चर्चा

मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर अखेर महाविकास आघाडीतील जागावाटपाची कोंडी फुटली असून २७० जागांवर एकमत झाले आहे. आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) व राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) हे तिन्ही पक्ष प्रत्येकी ८५-८५-८५ जागा लढवणार आहेत. उर्वरित जागांबाबत अन्य मित्र पक्षांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. दुसरीकडे महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम असला तरी तिन्ही पक्षांनी मिळून १८२ उमेदवार जाहीर केले आहेत. काही जागांबाबत अजूनही पेच असून त्यावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी दिल्ली गाठली आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होऊन २ दिवस उलटले तरी महायुती आणि महाविकास आघाडीतील कोणता पक्ष किती जागा लढवणार, याचा गुंता सुटत नव्हता. जागावाटपाच्या चर्चेचे गु-हाळ संपायला तयार नव्हते. महाविकास आघाडीच्या जागावाटपाची स्थिती ‘हत्ती गेला आणि शेपूट अडकले’, अशी झाली होती. काल रात्री तब्बल साडेपाच तास व आज तीन तास बैठक होऊनही एकमत होत नव्हते. अखेर आघाडीच्या नेत्यांनी शरद पवारांकडे धाव घेतली. काँग्रेस नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे संजय राऊत आणि अनिल देसाई, राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि अनिल देशमुख यांची शरद पवारांसोबत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक झाली. या बैठकीनंतर सर्व नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आघाडीच्या जागावाटपाचा निर्णय झाल्याची घोषणा केली.

कोण किती जागा लढवणार, याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागली होती. आमचे जागावाटप सुरळीतपणे पार पडले आहे. २७० जागांवर एकमत झाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (ठाकरे) हे तिन्ही पक्ष ८५-८५-८५ जागा लढवणार आहेत. उर्वरित १५ जागा समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पक्ष आदी मित्र पक्षांना सोडण्यात येणार आहेत. १८ जागांबाबत निर्णय होणे बाकी असून त्यावर उद्याच्या बैठकीत चर्चा होईल, असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अजून पूर्ण सुटलेला नसला तरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. शिवसेना फुटल्यानंतर सोबत राहिलेल्या १५ पैकी १४ जणांना उमेदवारी देण्यात आली. शिवडी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवर अजूनही सस्पेन्स कायम आहे. अजय चौधरी किंवा सुधीर साळवी यापैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. लोकसभेला पराभूत झालेल्या दोघांना विधानसभेच्या रिंगणात उतरवले आहे. आदित्य ठाकरे वरळीतूनच लढणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना येथून उमेदवारी देण्यात आली आहे तर लोकसभेला पराभूत झालेल्या राजन विचारे यांना ठाणे शहरमधून, शिंदे गटातून आलेल्या दिपेश म्हात्रे यांना डोंबिवलीतून, सुभाष भोईर यांना कल्याण ग्रामीणमधून, ओवळा माजिवडामधून नरेश मणेरा यांना उमेदवारी देण्यात आली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली; पण जाहीर केलेल्या जागांमध्ये काही जागांवर बदल होण्याची शक्यता असल्याचे खा. संजय राऊत महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत सांगितले.

शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाची पहिली यादी
विधानसभा मतदारसंघ- उमेदवाराचे नाव
चाळीसगाव – उन्मेश पाटील
पाचोरा -वैशाली सूर्यवंशी
मेहकर (अजा) -सिध्दार्थ खरात
बाळापूर -नितीन देशमुख
अकोला पूर्व -गोपाल दातकर
वाशिम (अजा) -डॉ. सिध्दार्थ देवळे
बडनेरा -सुनील खराटे
रामटेक -विशाल बरबटे
वणी -संजय देरकर
लोहा -एकनाथ पवार
कळमनुरी -डॉ. संतोष टारफे
परभणी -डॉ. राहुल पाटील
गंगाखेड -विशाल कदम
सिल्लोड -सुरेश बनकर
कन्नड -उदयसिंह राजपूत
संभाजीनगर मध्य -किशनचंद तनवाणी
संभाजीनगर प. (अजा) -राजू शिंदे
वैजापूर -दिनेश परदेशी
नांदगाव – गणेश धात्रक
मालेगाव बा -अद्वय हिरे
नाशिक मध्य -वसंत गीते
नाशिक पश्चिम -सुधाकर बडगुजर
पालघर (अज) -जयेंद्र दुबळा
बोईसर (अज) -डॉ. विश्वास वळवी
निफाड -अनिल कदम
भिवंडी ग्रामीण (अज)- महादेव घाटळ
अंबरनाथ (अजा) -राजेश वानखेडे
डोंबिवली -दिपेश म्हात्रे
कल्याण ग्रामीण -सुभाष भोईर
ओवळा माजिवडा -नरेश मणेरा
कोपरी पाचपाखाडी -केदार दिघे
ठाणे -राजन विचारे
ऐरोली -एम. के. मढवी
मागाठाणे -उदेश पाटेकर
विक्रोळी -सुनील राऊत
भांडुप पश्चिम -रमेश कोरगावकर
जोगेश्वरी पूर्व -अनंत (बाळा) नर
दिंडोशी -सुनील प्रभू
गोरेगाव -समीर देसाई
अंधेरी पूर्व -ऋतुजा लटके
चेंबूर -प्रकाश फातर्पेकर
कुर्ला (अजा) -प्रविणा मोरजकर
कलीना -संजय पोतनिस
वांद्रे पूर्व -वरुण सरदेसाई
माहिम -महेश सावंत
वरळी -आदित्य ठाकरे
कर्जत -नितीन सावंत
उरण -मनोहर भोईर
महाड -स्नेहल जगताप
नेवासा -शंकरराव गडाख
गेवराई -बदामराव पंडित
धाराशिव -कैलास पाटील
परांडा -राहुल ज्ञानेश्वर पाटील
बार्शी -दिलीप सोपल
सोलापूर दक्षिण -अमर रतिकांत पाटील
सांगोले -दीपक आबा साळुंखे
पाटण -हर्षद कदम
दापोली -संजय कदम
गुहागर -भास्कर जाधव
रत्नागिरी -सुरेंद्रनाथ (बाळ) माने
राजापूर -राजन साळवी
कुडाळ -वैभव नाईक
सावंतवाडी -राजन तेली
राधानगरी -के. पी. पाटील
शाहूवाडी -सत्यजित आबा पाटील

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR