लातूर : निवडणूक डेस्क
शिवसेना शिंदे गटाने ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यापाठोपाठ शिवसेना ठाकरे गटाने आपली ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यापैकी २६ मतदार संघात शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत थेट काट्याची टक्कर रंगणार आहे. या लढतीत कोण बाजी मारणार याकडे सा-यांचे लक्ष लागले आहे.
जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार आणि खासदारांनी मोठ्या प्रमाणावर बंडखोरी केली आणि शिवसेनेला मोठेच भगदाड पडले. यानंतर भाजपसह शिवसेना शिंदे गटाने सत्ता स्थापन केली. इतकेच नव्हे तर शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हही एकनाथ श्ािंदे यांना मिळाले. शिवसेनेला खिंडार पडल्यानंतर आता ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ श्ािंदे यांचा चांगलाच कस लागणार असल्याचे बोलले जात आहे.
आतापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवारांपैकी २६ मतदारसंघ असे आहेत, जिथे शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटातील उमेदवार थेट परस्परांना भिडणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ श्ािंदे यांच्या मतदारसंघापासून ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, स्ािंधुदुर्ग, संभाजीनगर यांसह राज्यातील अनेक ठिकाणी दोन्ही गटाचे उमेदवार आमनेसामने असणार आहेत.
विशेष म्हणजे धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना ठाकरे गटाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असून, ते थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देणार आहेत. महायुतीच्या जागावाटपात कुडाळची जागा शिवसेनेच्या श्ािंदे गटाला मिळाल्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. निलेश राणे कुडाळमधून निवडणूक लढवणार असून, वैभव नाईक यांच्यावर पुन्हा एकदा ठाकरे गटाने विश्वास दाखवत उमेदवारी जाहीर केली आहे.