21.2 C
Latur
Thursday, October 24, 2024
Homeलातूरलातूर ग्रामीण मतदारसंघ हे आमच्यासाठी कुटुंब 

लातूर ग्रामीण मतदारसंघ हे आमच्यासाठी कुटुंब 

लातूर : प्रतिनिधी
विकासरत्न विलासराव देशमुख हे लातूर शहर व लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाला आपले कुटुंब मानायचे. त्यामुळेच ते जे जे नवं ते लातूरला हवं, असे नेहमी म्हणायचे. त्यांच्या आदर्श विचारावरच आमची वाटचाल सुरु असून आमच्या सर्वांसाठी लातूर शहर व लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ कुटुंबच आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील मतदारांनी आपल्या कुटुंबाचे सदस्य असलेले माजी मंत्री आमदार अमित देशमुख व आमदार धिरज देशमुख यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यानिमित्ताने विलास सहकारी साखर कारख्याच्या  चेअरम श्रीमती वैशालीताई देशमुख यांनी दि. २४ ऑक्टोबर रोजी औसा तालूक्यातील टाका, बिरवली, शिवली, रिंगणी येथे संवाद मेळव्यात महिला मतदाराशी संवाद साधला.  यावेळी सौ. दीपशीखा देशमुख, सुनिताताई अरळीकर, शितलताई फुटाणे, औसा महिला कॉग्रेसच्या अध्यक्ष सईताई गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गेल्या पाच वर्षांमध्ये लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी आमदार म्हणून काम करताना मतदारसंघात जास्तीत जास्त विकास योजना आणल्या व त्या योजना ग्रामीण भागातील नागरीकापर्यंत पोहोचविल्या आहेत, असे नमुद करुन श्रीमती वैशालीताई देशमुख म्हणाल्या,  प्रत्येक गोर-गरीब, कष्टकरी, शेतक-यांसाठी विविध योजनेच्या माध्यमातून काम करण्याचा आमदार धिरज देशमुख यांनी प्रयत्न केला आहे. यापुढेदेखील ते लातूर ग्रामीण मतदारसंघात विकासाची कामे खेचून आणतील., असा विश्वास व्यक्त केला. यावेळी सौ.
दीपशिखा देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी संध्याताई कदम, मिराताई शिंदे, लक्ष्मीताई बंडगर, प्रेमनंदा कदम, अश्विनी भांगे, मेघा कदम, सविता शिंदे, संगीता सावंत, सुरेखा सावंत, अनुजा सावंत, मिरा सावंत, मिना सावंत, सुनिता शिंदे, सुनंदा पाटील, कार्तीकी कदम, शोभा कदम, सविता कदम, माणसी कदम, सुनिता गुजरे, मिराबाई कदम, जिजाबाई जाधव, शल्लुबी तांबोळी, नाजूकबी तांबोळी, सुनिता गरड, संगिता गरड, अंजीरबाई गरड, जयाबाई चौगुले, मिनाबाई पाटील, गवळण गुजारे, भागाबाई गुजारे, इंदाबाई गुजारे, संगिताताई साळुके, लिंबाबाई खडके, अचर्णाताई मेंठेकर, अपर्णा क्षीरसागर, गोदावरी क्षीरसागर आदी महिला, पुरुष, कॉग्रेस पक्षाचे कार्यकरते, गावकरी उपस्थित होते. सायंकाळी कासारगाव येथे झालेली पदयात्रा आणि संवाद बैठकीस गोपाळ बडे, जयदेव मोहिते, नंदकिशोर मोहिते, जजकुमार मोहिते, महादेव बुटके, जीवनाराव मोहिते, विनोद दिवे, सुनिल मोहिते, सूर्यकांत मोहिते, लक्ष्मण सपाटे, वामन मोहिते, बाबासाहेब मोहिते, विठ्ठल भगाडे, संभाजी कांबळे, संचिता रत्त्नगोले, रंजना मोहिते, महानंदा मोहिते, छायाबाई मोहिते, मुद्रिकाबाई सपाटे, राधाबाई केळे, मंगल जाधव, शेषाबाई भोसले, सुमनबाई मोहिते, रोहिणी तोडकर, कौशाबाई मस्के, अनुसया कांबळे, बालिका बडे, पुष्पा मोहिते, शकुंतला भगाडे, कलावती कदम आदी उपस्थित होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR