सातारा : प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीनेसातारा जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचे जाहीर केले असून शुक्रवारी वाई, पाटण आणि फलटणच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे वंचितचे आतापर्यंत जिल्ह्यातील सहा मतदारसंघाचे उमेदवार निश्चीत झाले आहेत. आता सातारा आणि क-हाड उत्तरचा उमेदवार जाहीर होणे बाकी आहे.
वंचित बहुजन आघाडीने जिल्ह्यातील माणचा उमेदवार प्रथम जाहीर केला. माणमूधन इम्तियाज नदाफ यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर कोरेगाव मतदारसंघातून चंद्रकांत कांबळे आणि क-हाड दक्षिणमधून संजय गाडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. शुक्रवारी तीन मतदारसंघाचे उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानुसार वाई मतदारसंघातून अनिल लोहार यांना उमेदवारी दिली आहे. तर पाटण मतदारसंघात बाळासाहेब जगताप आणि फलटणला सचिन भिसे यांना उतरवले आहे.
वंचितने आतापर्यंत जिल्ह्यातील सहा उमेदवार जाहीर केले आहेत. आता सातारा आणि क-हाड उत्तरचा उमेदवार जाहीर होणे बाकी आहे. वंचितकडे या दोन मतदारसंघासाठी अनेकांनी उमेदवारीची मागणी केली होती. त्यामुळे कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.