31.6 C
Latur
Thursday, April 17, 2025
Homeमहाराष्ट्रअंगणवाडी सेविकेचा खून

अंगणवाडी सेविकेचा खून

अहिल्यानगर : प्रतिनिधी
तालुक्यातील चिंचोडी पाटील शिवारातील मारुती वाडी येथील अंगणवाडीच्या इमारतीतच सेविकेचा खून झाल्याचे शुक्रवारी सकाळी उघड झाले. याप्रकरणी एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

उमा महेश पवार( वय ३२ ) या गावातीलच मारुतीवाडी येथील अंगणवाडीत सेविका म्हणून कार्यरत होत्या. काल गुरुवारी त्या नेहमीप्रमाणे अंगणवाडीत गेल्या होत्या. परंतु सायंकाळी उशिरापर्यंत परत आल्या नाहीत. नातेवाईक व ग्रामस्थांनी अंगणवाडीची पाहणी केली असता त्यांना अंगणवाडीला बाहेरून कुलूप लावल्याचा आढळले. ग्रामस्थांनी आत डोकावून पाहिल, तेव्हा त्यांना रक्ताचे डाग दिसले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत शोध घेतला. परंतु कुठल्याही प्रकारची माहिती मिळाली नाही. महिले अंगणवाडी सेविकेचा शोध घेत असताना अंगणवाडीपासून साधारण ३० मीटर अंतरावर असलेल्या एका बंधा-यामध्ये सेविकेचा मृतदेह मिळून आला. याप्रकरणी अंगणवाडी परिसरातच राहत असलेल्या एका व्यक्तीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR