28.6 C
Latur
Monday, April 21, 2025
Homeमहाराष्ट्रबाजारात आले अमूलचे बनावट तूप

बाजारात आले अमूलचे बनावट तूप

मुंबई : प्रतिनिधी
अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. सण-उत्सवाच्या या पार्श्वभूमीवर बाजारात सध्या अमूलचे बनावट तूप विकले जात आहे. बनावट तूप विकणा-यांना अमूलने इशारा दिला आहे.

याबाबत कंपनीने म्हटले आहे, बाजारात अमूलच्या नावाने बनावट तूप विकले जात आहे. विशेषत: अशा एक लिटर रिफिल पॅकमध्ये, हे तूप विकले जात आहे, जे अमूल कंपनी तीन वर्षांपासून बनवत नाही. त्यामुळे ग्राहकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी तूप खरेदी करण्यापूर्वी पॅकेजिंग तपासण्याचे सांगितले आहे.

बाजारात बनावट अमूल तूप विकले जात असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार लक्षात येता अमून कंपनीने सतर्क होत अमूलच्या नावाने बनावट तूप विकणा-यांना इशारा दिला आहे. बनावट उत्पादनांना आळा घालण्यासाठी अमूलने डुप्लिकेशन प्रूफ कार्टन पॅक सादर केले आहेत. कंपनीने सांगितले की, हे नवीन पॅकेजिंग अमूलच्या आयएसओ प्रमाणित डेअरीमध्ये अ‍ॅसेप्टिक फिलिंग तंत्रज्ञानाचा वापर करून बनवले आहे. हे तंत्रज्ञान उत्कृष्ट गुणवत्ता मानके सुनिश्चित करते. त्यानुसार, ग्राहकांनी तूप खरेदी करण्यापूर्वी पॅकेजिंग तपासावे असे आवाहन अमूल कंपनीने केले आहे. अमूलने ग्राहकांच्या कोणत्याही शंका किंवा तक्रारींसाठी नंबर देखील जारी केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR