22.3 C
Latur
Saturday, October 26, 2024
Homeपरभणीराष्ट्रीय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत आद्या बाहेतीला रौप्य पदक

राष्ट्रीय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत आद्या बाहेतीला रौप्य पदक

परभणी : गोवा येथे दि. १८ ते २५ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी करत परभणीच्या आद्या बाहेती हिने रौप्यपदक पटकावले आहे. ११ वर्षे मुलींच्या गटात पहिल्या टप्प्यामध्ये झालेल्या साखळी गटातील पहिल्या सामन्यात कर्नाटकच्या संतोष सक्ष्या या खेळाडूवर ३-१ असा तर दुस-या सामन्यात पाँडिचेरीच्या तुथिक्षा ए या खेळाडूवर ३-० असा विजय मिळवला. या खेळाडूवर ११-४, १२-१०, ११-७ (३-०) आसा सोपा विजय मिळवत उप उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश केला. या फेरीत आद्या समोर हरयानाची असणारी आठव्या मानांकित आवनी जांगु या खेळाडूंचे कडवे आव्हान होते ते आद्याने ११-३, ११-९, ११-५ असे सरळ सेटमध्ये मोडीत काढून उपांत्य-पूर्व फेरीत प्रवेश केला.

चुरशीच्या झालेल्या उपांत्य-पूर्व फेरीत महाराष्ट्रच्याच जिनाया वधान या खेळाडूवर ११-७, ११-७, ७-११, १५-१३ (३-१) असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश करत आसामची असणारी चौथे मानांकन प्राप्त गोगोई इशानी या खेळाडूवर ११-७, ११-४, ११-९ (३-०) आसा सहज व सोपा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रथम मानांकित आसामच्या पौल दिविजा या खेलदुकडून (१-३) आसा पराभव स्वीकारावा लागल्याने आद्याला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.

आद्या बाहेती खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षक चेतन मुक्तावार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. आद्याच्या यशासाठी विक्रम हत्तेकर, नरंिसह चाटे, सूरज भुजबळ, रोहित जोशी, तुषार जाधव, श्रीकांत दुधारे, पवन कदम, पियूष रमावत, साक्षी देवकते, सौरभ मस्के, हर्षवर्धन घाडगे यांनी सहकार्य केले. या यशाबदल जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, नानक सिंग बस्सी, सुयश नाटकर, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष समशेर वरपुडकर, कार्याध्यक्ष डॉ.माधव शेजुळ, जिल्हा उपाध्यक्ष संतोष सावंत, परभणी क्लबचे सचिव विवेक नावंदर, जिल्हा सचिव गणेश माळवे, डी. पी. पंडीत, वरिष्ठ खेळाडू,पालक यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR