20.7 C
Latur
Saturday, October 26, 2024
Homeपरभणीमतदानावर बहिष्कार टाकलेल्या कोल्हेवाडीला गटविकास अधिका-यांची भेट

मतदानावर बहिष्कार टाकलेल्या कोल्हेवाडीला गटविकास अधिका-यांची भेट

पूर्णा : तालुक्यातील कोल्हेवाडी येथील ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुरावस्थेच्या निषेधार्थ विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभुमीवर गटविकास अधिकारी मयूरकुमार आंदेलवाड व त्यांच्या पथकाने दि.२५ ऑक्टोबर रोजी कोल्हेवाडी गावाला भेट देऊन रस्त्याची पाहणी केली. त्यावेळी ग्रामस्थांनी गावात सोयी सुविधा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचा निर्णय मागे घेणार नाहीत असे सांगितले.

कोल्हेवाडी येथील ग्रामस्थ व डेमोक्रिडीत युथ फंडेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने या गावच्या रस्त्याच्या दुरावस्थेच्या निषेधार्थ गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून वेगवेगळे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले तसेच सातत्याने पाठपुरावा केला. परंतु संबंधित यंत्रणांनी याकडे ढुंकुनही पाहिले नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी या रस्त्याच्या अवस्थेच्या निषेधार्थ आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याप्रमाणे संतप्त ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. निवडणुकीवर बहिष्कार घातल्याने प्रशासन खडबडून जागे झाल्याने कोल्हेवाडी गावाला गटविकास अधिकारी यांनी भेट देऊन संबंधित पांदण रस्त्याची पाहणी केली. तसेच दोन दिवसात कामाला सुरुवात करण्यात येईल असे आंदेलवाड यांच्याकडून ग्रामस्थांना सांगण्यात आले. त्यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ डेमोक्रेडिट युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR