22.1 C
Latur
Sunday, October 27, 2024
Homeमहाराष्ट्रमाढ्यात मोहिते, पंढरपुरात अनिल सावंत? शरद पवार अनपेक्षित उमेदवार देणार

माढ्यात मोहिते, पंढरपुरात अनिल सावंत? शरद पवार अनपेक्षित उमेदवार देणार

मुंबई : विशेष प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार माढा विधानसभा मतदारसंघात धक्कातंत्र वापरणार असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या माढा मतदारसंघातून भाजपचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नावाची घोषणा आज होण्याची शक्यता आहे. माढ्यात आमदार बबनदादा शिंदे, अभिजीत पाटील या दोघांच्या नावाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असताना पवारांकडून वेगळा डाव टाकण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघात अपेक्षितपणे सिद्धी रमेश कदम यांना उमेदवारी जाहीर करत शरद पवारांनी आपल्या धक्का तंत्राची प्रचिती दिली. मोहोळमध्ये संजय शिरसागर, राजू खरे, लक्ष्मणराव ढोबळे अशी नावे चर्चेत असताना आणि स्वत: माजी आमदार रमेश कदम यांनी उमेदवारी मागितली असताना थेट कदम यांच्या कन्येलाच उमेदवारी देत सर्वांना धक्का दिला.

याचप्रमाणे तानाजीराव सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांना पंढरपूरमध्ये उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. पंढरपूर विधानसभा मतदारसंघात अद्याप उमेदवार जाहीर केला नसला तरी प्रशांत परिचारक यांची समजूत घालण्यात भाजप यशस्वी झाली आहे. पंढरपूरमध्ये भगीरथ भालके व संतनाना देशमुख आणि अनिल सावंत ही नावे चर्चेत आहेत. पंढरपूरसाठी ही शरद पवार असाच धक्कातंत्र वापरण्याची शक्यता असून अनपेक्षित नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. या धक्का तंत्राची लॉटरी आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांना लागण्याची दाट शक्यता आहे. भाजपचे आर्थिक दृष्ट्या तगडे उमेदवार म्हणून ओळखले जाणारे आमदार समाधान अवताडे यांना तेवढ्याच ताकदीने तोंड देऊ शकणारा उमेदवार म्हणून अनिल सावंत यांच्याकडे पाहिले जात आहे. अशावेळी शरद पवार हे पंढरपूरसाठी अनिल सावंत यांच्या नावाची घोषणा करू शकतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR