20.6 C
Latur
Sunday, October 27, 2024
Homeपरभणीदेशाचे भविष्य युवकांच्या हाती : प्रा. शिंदे

देशाचे भविष्य युवकांच्या हाती : प्रा. शिंदे

परभणी : आपल्याला संविधानाने दिलेले अधिकार व कर्तव्य याची माहिती असणे आवश्यक आहे. लोकशाहीमध्ये मतदान हा आपला हक्क आणि आपले कर्तव्य आहे. मतदान प्रक्रियेत नवमतदार यांनी सहभागी झाले पाहिजे. योग्य उमेदवाराला मत देऊन देशाचे भविष्य उज्ज्वल करावे. यासाठी युवकांच्या हाती देशाचे भविष्य असल्याचे प्रतिपादन जिल्हा स्वीप नोडल अधिकारी प्रा. गणेश शिंदे यांनी केले.

जवाहर नवोदय विद्यालयात एनसीसीचा कॅम्प आयोजित करण्यात आला होता. त्या कॅम्पमधील सहभागी झालेल्या नव मतदार, भावी मतदार विद्यार्थ्यांसाठी दि. २५ रोजी जिल्हा पथकाच्या वतीने मतदान जनजागृतीचा कार्यक्रम घेऊन मतांचा जागर केला. यावेळी उपशिक्षणाधिकारी गणराज येरमळ, कर्नल एम. रंगाराव, कमाडिंग ऑफिसर कर्नल के.दिलीप रेड्डी, प्रशासन अधिकारी मेजर प्रशांत सराफ, कॅम्प एडजिव्हंट लेफ्टनंट जयकुमार देशमुख, सुभेदार मेजर घनश्याम सिंग, एनसीसी ऑफिसर सोपान सावळे, रंगनाथ राठोड, सुखदा नवशिंदे, सुभेदार राकेश कुमार, रमण शर्मा, शिवाजी व्हरंगुळे, हवालदार रणजीत सिंग, रमेश रोमिला, हरीश कुमार, अध्यान सिंग, जितेंद्र पाल आदिंची उपस्थिती होती.

पुढे बोलताना जिल्हा स्वीप अधिकारी शिंदे म्हणाले की, देशाच्या भविष्याची धुरा आपल्यावर असल्यामुळे नव मतदारांनी स्वत: तर मतदान कराच आणि कुटुंबातील इतर मतदार सदस्यांचे देखील मतदान करून घ्यावे. परिसरातील मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन केले.

यावेळी स्वीप सदस्य प्रवीण वायकोस, अरंिवद शहाणे, प्रफुल्ल शहाणे, मोहन आल्हाट, ज्ञानेश्वर पाथरकर, महेश देशमुख, शिवाजी कांबळे, का.रा.चव्हाण, रामप्रसाद अवचार, प्रा. प्रवीण लोणारकर, लक्ष्मण गारकर, सुधाकर गायकवाड, वैभव पुजारी यांनी आपल्या वेगवेगळ्या संगीत, गीत आणि लघु नाटिकातून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान जनजागृती पर कार्यक्रमातून उपस्थित विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले. याप्रसंगी अरविंंद शहाणे यांनी विद्यार्थ्यांना मतदानाची शपथ दिली. प्रास्ताविक प्रा. भगवान काळे यांनी केले. सूत्रसंचालन त्र्यंबक वडसकर व बबन आव्हाड यांनी तर आभार हनुमंत हंबिर यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR