परभणी : गेली २६ वर्ष धन्वंतरी जयंती निमित्त आयुर्वेद व्यासपीठ शाखा परभणी आरोग्यपर व्याख्यानांचे आयोजन करत असते. यावेळेस २७ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वैद्य मृत्युंजय शर्मा एम.डी., पीएच.डी. (नागपूर)यांचे प्रकृती परीक्षण- करी आरोग्य रक्षण या विषयावर व्याख्यान झाले. व्याख्यानामध्ये डॉ. शर्मा यांनी वात, पित्त आणि कफ या तीनही प्रकृतींची वैशिष्ट्ये, त्यांनी पाळावयाची पथ्ये, आहार विहार, यांचे अतिशय अभ्यासपूर्ण शैलीमध्ये वर्णन केले. त्याला मिळालेली नर्म विनोदाची झालर हे आजच्या व्याख्यानाचे वैशिष्ट्य होय.
श्री शिवाजी महाविद्यालय सभागृहामध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रावजी सोनवणे तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा पुरावठा अधिकारी परभणी गोविंद रणवीरकर, उप कोषागार अधिकारी परभणी नीलकंठ पाचंगे, आय एम ए, आय डी ए, निमा, फार्मसी असोसिएशन, एम आर असोसिएशन, एचडीए या संघटनांचे अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते.
सूत्रसंचालन डॉ साक्षी देशपांडे यांनी तर प्रास्ताविक अध्यक्ष डॉ.विनोद पत्की यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ. शांतादेवी वेदप्रकाश पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय हट्टा येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेली ग्रंथ दिंडी हे जनसामान्यांचे आकर्षण ठरले. धन्वंतरी स्तवन डॉ स्मिता कुलकर्णी यांनी तर वक्ता परिचय डॉ. पूजा बाहेती यांनी दिला. आभार प्रदर्शन उपाध्यक्ष विद्या भालेराव यांनी केले तर अध्यक्षीय समारोप अपर जिल्हाधिकारी डॉ. काळे यांनी केला. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. धीरज देशपांडे यांचे आरोग्य दान झाले.
केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ रवी भंडारी, डॉ. जयश्री कालानी, डॉ. शिरीष कळमनुरीकर, डॉ. दीपक करजगीकर यांची उपस्थिती लाभली. यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष डॉ. मनोज कुमार दीक्षित, सचिव डॉ.गुरुदत्त चौधरी, कोषाध्यक्ष डॉ. विवेक गुंडेवार, डॉ. कुणाल कौसडीकर, डॉ.संतोष वाईकर, डॉ.अमोल दीक्षित, डॉ.मुक्तेश्वर पारवे, डॉ. मेघना मुंदडा, डॉ. एकनाथ चोपडे, डॉ.अर्चना ढमढेरे, डॉ. पद्माकर फुटाणे आदींनी परिश्रम घेतले.