28.3 C
Latur
Tuesday, November 5, 2024
Homeमहाराष्ट्रशिंदे गटाचे आमदार वनगा बेपत्ता!

शिंदे गटाचे आमदार वनगा बेपत्ता!

तिकीट कापण्यात आल्याने अस्वस्थ

पालघर: प्रतिनिधी
शिवसेनेत केलेल्या बंडानंतर एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेले श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापण्यात आल्याने ते अस्वस्थ होते. त्यांनी माध्यमांश बोलताना आपली भावना व्यक्त केली होती. त्यांच्या पत्नीने श्रीनिवास वनगा हे आत्महत्येची भाषा करीत असल्याचेही सांगितले होते. दरम्यान ते गेल्या १२ तासांपासून नॉट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पालघर विधानसभेचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारल्याने नाराज असून ते अचानक घरातून निघून गेल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. वनगा यांनी प्रसारमाध्यमांसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली फसवणूक केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर वनगा हे घरातून निघून गेले आहेत.

याबाबत आमदार श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा यांच्याशी संवाद साधला. त्यांनी सांगितले, तिकीट कापल्यामुळे श्रीनिवास वनगा नैराश्यात होते. ते आयुष्य संपवण्याची भाषा करीत होते. आपण उद्धव ठाकरेंना धोका दिल्याचेही ते म्हणाल्याचे श्रीनिवास वनगा यांच्या पत्नीने सांगितले.

पालघर विधानसभेचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापण्यात आले आणि त्यांचे तिकीट राजेंद्र गावित यांना देण्यात आले आहे. ही यादी बाहेर आल्यानंतर कुणालाही न सांगते ते घराबाहेर पडल्याची माहिती आहे. तरी पोलिस प्रशासन त्यांचा शोध घेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR