28.3 C
Latur
Tuesday, November 5, 2024
Homeनांदेडनांदेडमधून ‘एमआयएम’ची माघार

नांदेडमधून ‘एमआयएम’ची माघार

भाजप-काँग्रेसमध्ये होणार लढत!

नांदेड : प्रतिनिधी
लोकसभेच्या नांदेड मतदारसंघातून एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र काँग्रेसने दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली. तर भाजपने काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांचे बंधू भाजपचे जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे यांना उमेदवारी देत मैदानात उतरवले. आज मात्र काँग्रेसच्या दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या मुलाविरोधात न लढण्याचा निर्णय जाहीर करत एमआयएमने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर केला आहे.

एखाद्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधीचे निधन झाले असेल तर त्या मतदारसंघात निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी राजकीय परंपरा महाराष्ट्रात आहे. मात्र अनेकदा ही परंपरा मोडीत काढून पोटनिवडणुका लढवल्या गेल्या. लोकसभेच्या नांदेड मतदारसंघाची निवडणूक ही विधानसभेसोबतच होत आहे.
काँग्रेस आणि भाजपमध्ये उमेदवारीवरून जेव्हा चर्चा सुरू होत्या आणि काँग्रेसने रवींद्र चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली तेव्हा एमआयएमचे माजी खासदार तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आपण नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांच्या उमेदवारी संदर्भात नांदेडमधील एमआयएमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्या होत्या.

त्याला दुजोरा देताना इम्तियाज जलील यांनीही आपण निवडणूक लढवणार असल्याचे सांगत रंगत आणली होती. मात्र आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एमआयएमने या पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. ‘नांदेड से हमारा पुराना कनेक्शन है’, असे सांगत या जिल्ह्यामध्ये आमच्या पक्षाला सर्वाधिक यश मिळाले होते.

या जिल्ह्यात आमचे संघटन असून नांदेडची पोटनिवडणूक आम्ही ताकदीने लढवणार आहोत, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले होते. आज मात्र काँग्रेसच्या दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या मुलाविरोधात न लढण्याचा निर्णय जाहीर करत एमआयएमने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर केला आहे.
एमआयएमच्या माघारीनंतर आता नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होणार आहे. आम्ही नांदेडमधून लढण्याचे जाहीर केले होते, परंतु पक्षाचे नेते आणि नांदेड जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करून आम्ही निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याचे इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR