19.6 C
Latur
Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रशालेय बॅडमिंटन स्पर्धेत पुणे संघाचे वर्चस्व

शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पुणे संघाचे वर्चस्व

परभणी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा बॅडमिंटन संघटना परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत पुणे विभागाच्या संघाचे वर्चस्व राहिले.

१४ वर्षाखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक प्रियदर्शनी स्कूल एसएससी पुणे (पुणे विभाग), द्वितीय क्रमांक सेवा सदन सक्षम स्कूल नागपूर(नागपूर विभाग) तर तृतीय क्रमांक वूडरिच हायस्कूल छत्रपती संभाजी नगर(छत्रपती संभाजी नगर) विभागाच्या संघाने पटकावला. १७ वर्षाखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक डीएसपी इंटरनॅशनल स्कूल रायगड(मुंबई विभाग), द्वितीय क्रमांक सर परशुरामभाऊ कॉलेज पुणे (पुणे विभाग) तर तृतीय क्रमांक सेंड जोसेफ कॉन्व्हेंट गर्ल हायस्कूल नागपूर(नागपूर विभाग) संघाने पटकावला.

१९ वर्षाखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल पुणे(पुणे विभाग), द्वितीय क्रमांक फ्रावशी अकॅडमी एसएससी नासिक (नाशिक विभाग) तर तृतीय क्रमांक पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर (छत्रपती संभाजी नगर) विभागाच्या संघाने पटकावला. या सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR