24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरलातुरात भाजपमध्ये भूकंप; माजी खासदार सुधाकर शृंगारे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

लातुरात भाजपमध्ये भूकंप; माजी खासदार सुधाकर शृंगारे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

लातूर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. सर्वत्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लगबग सूरु असताना भाजपाचे माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत लातूर भाजपाला मोठा धक्का दिला. लातूर भाजपात झालेल्या भुकंपाची तीव्रता राज्यभर पोचली.

२०१९ च्या लातूर लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून निवडणुक लढलेले व विजय झालेले सुधाकर शृंगारे यांनी पुन्हा २०२४ मध्ये भाजपाकडून लोकसभा लढली. यावेळी मात्र त्यांना पक्षांतर्गत बंडाळीमुळे पराभव पत्करावा लागला. शृंगारे यांनी काँग्रेस महाविकास आघाडीच्या प्रचार शुभारंभ विराट सभेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये प्रवेश करताच त्यांनी गेल्या पाच वर्षांत भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी त्यांचा कसा छळ केल्याचा पर्दाफाश केला. भाजपाचे मोठे नेते लातुरात असताना माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन लातूर भाजपात घडलेल्या भूकंपाची तीव्रता राज्यभर पोचली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR