नवी दिल्ली : ब्लूमबर्गने जगातील सर्वात श्रीमंतांची यादी जाहीर केली असून यामध्ये भारतीय उद्योगपतींचा देखील समावेश आहे. या यादीत भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी हे १३ व्या क्रमांकावर असून उद्योजक गौतम अदानींचा पुन्हा श्रीमंतांच्या २० नावांमध्ये समावेश झाला आहे.
देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या संपत्तीत अचानक वाढ झाली आहे. ते पुन्हा एकदा जगातील २० श्रीमंतांच्या यादीत सामील झाले आहेत. मंगळवारी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या समूहाचे बाजारमूल्य १ लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. या वाढीनंतर ते ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत टॉप-२० मध्ये सामील झाला आहे. त्यांची एकूण संपत्ती ६.५ अब्ज डॉलर्सने वाढून ६६.७ अब्जांच्या पुढे गेली आहे. यापूर्वी ते या यादीत २२ व्या स्थानावर होते.