16.9 C
Latur
Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्रअवघ्या १५ दिवसांत तब्बल १८७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त!

अवघ्या १५ दिवसांत तब्बल १८७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त!

आचारसंहितेचा भंग

मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी गेल्या १५ ऑक्टोबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली. या दरम्यानच्या काळात आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचे अनेक प्रकरणे पुढे आले आहे. तर राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत कोट्यवधींची मालमत्ता देखील जप्त जप्त करण्यात आली आहे. यात बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज आणि मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत १५ ते ३० ऑक्टोबर या १५ दिवसांच्या दरम्यान एकूण १८७ कोटी ८८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

निवडणूक आचारसंहितेच्या काळात सजगपणे कार्यरत असलेल्या राज्यातील विविध अंमलबजावणी यंत्रणांनी ही कामगिरी केली आहे. यात विविध ठिकाणी पोलीस विभाग आणि इतर यंत्रणांनी उभारलेले तपासणी नाके योग्य पध्दतीने कार्यरत असल्यामुळे हे यश मिळाले आहे. यामध्ये प्रामुख्याने राज्य पोलिस विभागाने सुमारे ७५ कोटी रूपये, इन्कमटॅक्स विभागाने सुमारे ६० कोटी रूपये, राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुमारे ११ कोटी रूपये यांचा प्रामुख्याने समावेश आहे. मतदारांना आचारसंहिता भंगाचा प्रकार आढळल्यास आयोगाच्या ‘सी-व्हिजील’ अ‍ॅपवर तक्रार करता येते. या तक्रारींची माहिती सर्व अंमलबजावणी यंत्रणांना दिली जात असल्याने आवश्यक ठिकाणी जप्तीची कारवाई केली जात आहे.

पालघरमध्ये चार कोटी २५ लाखांची रोकड जप्त
पालघरमध्ये आज चार कोटी २५ लाखांची रोकड पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. तलासरीतील उधवा तपासणी नाक्यावर तपासा दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. दादरा नगर हवेली येथून महाराष्ट्रात रोकड आणली जात असताना पोलिसांकडून ही रोकड जप्त करण्यात आली आहे. पालघरच्या तलासरी पोलिसांनी ही कारवाई करत रोकड ताब्यात घेऊन पोलिस प्रशासनाकडून पुढील तपास सुरू केला आहे.

७९९५ उमेदवार विधानसभेच्या रिंगणात
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर रोजी केली होती. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक एका टप्प्यात पार पडत आहे. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. या २८८ मतदारसंघासाठी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २३ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीत राज्यातील जवळपास सर्वच मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर उमदेवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उमदेवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर निवडणूक आयोगाने माहिती दिली आहे. त्यानुसार ७९९५ उमेदवार विधानसभेच्या रिंगणात असून त्यांनी १०९०५ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमुळे पक्षांची संख्या वाढताना इच्छुक उमेदवार आणि बंडखोरांची संख्या ही कमालीची वाढली आहे, हेच यातून दिसून येत आहे. आता तिपटीने वाढलेल्या उमेदवारांपैकी बंडखोरांना बसवणे, वोट कापणा-या उमेदवारांना शांत करणे, हे राज्यातील दोन्ही प्रमुख पक्षांसमोरचा सर्वांत मोठा आव्हान राहणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR