18.3 C
Latur
Tuesday, November 26, 2024
Homeमहाराष्ट्रनाना पटोलेंनी मांडले कॉँग्रेसचे धोरण...

नाना पटोलेंनी मांडले कॉँग्रेसचे धोरण…

महिलांना सन्मान-सुरक्षितता, हमीभाव, मोफत शिक्षण, एमपीएससीद्वारे नोकरभरती

मुंबई : विशेष प्रतिनिधी
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात कॉँग्रेसच्या धोरणात्मक मुद्यांवर विवेचन केले. महिला, मुलींची सुरक्षितता, शेतक-यांचे प्रश्न, आरोग्य आणि शिक्षण व्यवस्थेतील बदल, नोकरभरती या मुद्यांवर भाष्य केलं.

नाना पटोले म्हणाले, महिलांना सन्मान देणे ही प्राथमिकता, लहान मुली शाळेत किंवा बाहेर असतील त्या सुरक्षित राहिल्या पाहिजेत, आमचे सरकार काम करेल, असं सांगितलं.

शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र निर्माण करायचा आहे. अन्नदात्याला ताकद देणं, कर्जातून मुक्त करणं, शेतमालाला योग्य भाव देणं ही आमची प्राथमिकता आहे, असं पटोले यांनी स्पष्ट केलं.

आरोग्य व्यवस्था आणि शैक्षणिक व्यवस्थेमध्ये निर्माण झालेली स्थिती पाहता, या क्षेत्रातील पदं भरणार आहोत. शैक्षणिक व्यवस्थेत बदल करण्याची गरज आहे. आम्ही शाळेतील मुलांना मोफत दोन ड्रेस, पुस्तक देण्याचा निर्णय घेतला होता, या सरकारला दिवाळी आली तरी ते पोहोचवता आलेलं नाही, असं नाना पटोले यांनी म्हटलं.

लोकसभा निवडणुकीपूर्वी महिलांना मोफत साड्या वाटल्या होत्या, त्या साड्या महिलांनी तहसीलदार कार्यालयात नेऊन टाकल्या, काहींनी त्या साड्या पेटवल्या, असं नाना पटोले म्हणाले. नोकर भरती एमपीएससीद्वारे केली जाईल. कंत्राटदारांच्या माध्यमातून मुलांना नोकरीत घेतलं जाणार नाही, असं नाना पटोले यांनी म्हटलं. महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न करणार, महागाई कमी करुन गरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे, असंही ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR