26.6 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeपरभणीनिवडणूक निरीक्षक के. हरीथा यांनी निवडणूक कामकाजाचा घेतला आढावा

निवडणूक निरीक्षक के. हरीथा यांनी निवडणूक कामकाजाचा घेतला आढावा

जिंतूर : सेलू जिंतूर विधानसभा मतदार संघासाठी नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निरीक्षक के. हरीथा यांनी तहसील कार्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे भेट देऊन विविध कामांचा दि.२९ ऑक्टोबर रोजी आढावा घेतला.

जिंतूर, सेलू विधानसभा निवडणुक आयोगाने घालून दिलेल्या निर्देशानुसार पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने निरीक्षक के.हरिथा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यावेळी जिंतूर, सेलू मतदार संघाचा आढावा घेतला. यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्था या ठिकाणी स्ट्रॉगरूम, मतमोजणी कक्ष, ट्रेनिंग हॉल व इतर मतदानासाठी आवश्यक असलेल्या सर्व साहित्याची पाहणी केली. या शिवाय तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी व कर्मचा-यांचा आढावा घेतला.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी, पोलीस उपविभागीय अधिकारी जीवन बेनिवाल, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार राजेश सरोदे, शिवाजी मगर, युवराज पौळ, पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार सुग्रीव मुंढे, प्रशांत राखे, मंडळ अधिकारी मोहसीन पठाण, तलाठी हनुमान बोरकर यांची उपस्थितीती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR