23.6 C
Latur
Tuesday, December 3, 2024
Homeमहाराष्ट्रपोलिस महासंचालक रश्मी शुक्ला पक्षपाती

पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला पक्षपाती

तत्काळ हटवण्याची नाना पटोले यांची निवडणूक आयोगाकडे तिस-यांदा मागणी

मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला पक्षपाती असल्याने त्यांना तत्काळ प्रभावाने हटवण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला पक्षातर्फे गुरुवारी तिस-यांदा पत्र पाठवून ही मागणी करण्यात आली आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया सुरू झालेली असतानाही निवडणूक आयोगाने मात्र काँग्रेसच्या तक्रारीची आणि मागणीची अद्याप दखल घेतलेली नाही. त्याबद्दल पटोले यांनी नाराजी व्यक्त केली. शुक्ला या वादग्रस्त अधिकारी असून त्यांच्याकडून महाविकास आघाडीतील पक्षांच्या नेत्यांना त्रास देण्याचा तसेच भाजपाला मदत करण्याचा प्रकार घडत असल्याचा आरोप काँग्रेसने सातत्याने केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुंबई भेटीवेळी देखील त्याबाबत तक्रार करून त्यांना हटवण्याची मागणी करण्यात आली होती. शुक्ला पदावर असताना नि:पक्षपाती पध्दतीने तसेच पारदर्शकतेने काम करतील, असे वाटत नाही त्यामुळे त्यांना तत्काळ पदावरून हटवावे अशी मागणी पटोले यांनी केली आहे.

काँग्रेसने यापूर्वी २४ सप्टेंबर आणि ४ ऑक्टोबर रोजी दोन पत्रं पाठवली होती त्यात शुक्ला यांना हटवण्याची मागणी केली होती. आता ३१ ऑक्टोबर रोजी पक्षाने तिस-यांदा पत्र पाठवले असून शुक्ला यांना हटवण्याची मागणी केली आहे.
शुक्लांविरोधात काँग्रेसचे काय आहेत आक्षेप? – पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला या विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास देण्यासाठी आणि त्यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी राज्यातील पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक यांना सूचना करतात. विरोधी पक्षाच्या नेत्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.

शुक्ला यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप केले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, याची आठवण पटोलेंनी करून दिली आहे. मात्र, राज्यात सत्तांतर होऊन महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर शुक्ला यांना पोलिस महासंचालक पदावर नियुक्त करण्यात आले तसेच निवृत्त झाल्यानंतर त्यांना नियमबा पध्दतीने मुदतवाढ दिल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.

काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले, राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यावर खूप गंभीर आरोप आहेत. अशी व्यक्ती आज पोलिस महासंचालक आहे. त्यांच्याकडून निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात अशी अपेक्षा तुम्ही करू शकता का? आम्ही म्हटले आहे की, निवडणुकीचा लगाम हातात आहे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR