23.9 C
Latur
Tuesday, November 5, 2024
Homeलातूरवसुंधरा प्रतिष्ठानतर्फे अनाथ बालकांना कपडे, मिठाईचे वितरण 

वसुंधरा प्रतिष्ठानतर्फे अनाथ बालकांना कपडे, मिठाईचे वितरण 

लातूर : प्रतिनिधी
येथील वसुंधरा प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी लातूर शहरातील खुशी ग्राम येथील अनाथ बालकांसोबत माणुसकीची दिवाळी हा उपक्रम साजरा करण्यात आला. यावेळी या अनाथ आश्रमातील बालकांना नवीन कपडे, मिठाई, फटाके तसेच सेलिब्रेशन किट वितरीत करुन त्यांच्यासोबत हा सण साजरा झाला. यावेळी नवीन कपडे भेटल्याने या बालकांच्या चेह-यावर आनंद झळकत होता.
या उपक्रमात हास्य कलावंत बालाजी सुळ, सिने निर्माते श्रीनिवास कुलकर्णी, नृत्य कलावंत जान्हवी पाटील यांनी सहभागी होऊन या बालकांचा उत्साह वाढविला. वसुंधरा प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी माणुसकीची दिवाळी हा उपक्रम साजरा करून सुभेदार रामजी नगरातील खुशी ग्राम येथील अनाथ बालकांसोबत दिवाळी साजरी झाली. यावेळी या बालकांना नवीन कपडे, मिठाई, दिवाळी फराळ, फटाके भेट देण्यात आले. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी वसुंधरा प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा प्रा. योगेश शर्मा, उपाध्यक्ष रामेश्वर बावळे, कार्यकारिणी अध्यक्ष अ‍ॅड. अजित चिखलीकर, कार्याध्यक्ष अमोल स्वामी, राहुल माशाळकर, संजय माकुडे, अमित कुलकर्णी, प्रवीण सूर्यवंशी, अतुल मुंजाळ, सारंग माळी, प्रसाद कुंभार, प्रसाद कोळी, प्रवीण कुंभार, विश्वा माळी, आशिष बोळसुरे, अर्जुन सूर्यवंशी, ओम सलगर, अभिजीत बैकरे आदींनी पुढाकार घेतला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR