23.9 C
Latur
Tuesday, November 5, 2024
Homeनांदेडश्रीजया चव्हाण यांची संपत्ती २० कोटी!

श्रीजया चव्हाण यांची संपत्ती २० कोटी!

पप्पू कोंडेकर कोट्यधीश प्रतिस्पर्धी

नांदेड : प्रतिनिधी
निवडणूक काळात सर्वांच्या चर्चेचा विषय असतो, ते म्हणजे उमेदवारांची संपत्ती किती? उमेदवार लखपती आहे की, करोडपती हा कुतुहलाचा विषय ठरतो. भोकर मतदार संघातील उमेदवारांच्या संपत्तीकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे. या मतदार संघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण भाजपकडून निवडणूक लढवत असून त्यांची २० कोटी रुपये चल आणि अचल संपत्ती असल्याचं शपथपत्रात नमूद करण्यात आलं आहे. तसंच अदानींच्या कंपनीतही शेअर्स देखील आहेत.

श्रीजया चव्हाण यांचं शिक्षण बी.ए, एल.एल.बी पर्यंत पूर्ण झालं आहे. त्यांच्याकडे २० कोटींची संपत्ती असल्याचं त्यांनी शपथ पत्रात नमूद केलं आहे. त्यात ४ कोटी १७ लाख ८८ हजार ३७२ रुपये चल आणि १६ कोटी रुपये अचल संपत्तीचा समावेश आहे. शिवाय श्रीजया चव्हाण यांची अदाणी ग्रुपमध्ये गुंतवणूक आहे. श्रीजयाकडे २५० ग्रॅम सोनं म्हणजेच १९ लक्ष ५७ हजार ५०० रुपयाचं सोनं आणि १० किलो चांदी म्हणजेच ९ लक्ष ८४ हजार रुपये किमतीचे दागिने नावावर असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

दुसरीकडे काँग्रेसने अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांच्या विरोधात पप्पू पाटील कोंडेकर यांना मैदानात उतरवलं आहे. त्यांची संपत्ती देखील कोट्यवधींच्या घरात आहे. १ कोटी ३० लाख ४४ हजार ३३२ रुपये हे चल, तर १ कोटी १० लाख ४७ हजार ७४६ एवढी अचल संपत्ती असल्याचं शपथ पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR