23.9 C
Latur
Tuesday, November 5, 2024
Homeराष्ट्रीय२५ नोव्हेंबरला सुरू होणार संसदेचे हिवाळी अधिवेशन

२५ नोव्हेंबरला सुरू होणार संसदेचे हिवाळी अधिवेशन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
संसदेचे हिवाळी अधिवेशन या महिन्याच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. हे सत्र २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबरपर्यंत होण्याची शक्यता आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर रोजी सुरू होऊ शकते. या अधिवेशनाचे वैशिष्ट्ये म्हणजे यावेळी एक दिवस दोन्ही सभागृहाचे सदस्य संसदेच्या जुन्या इमारतीत कामकाजासाठी बसू शकतात.

लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे संयुक्त सत्र २६ नोव्हेंबर रोजी बोलावले जाऊ शकते. राज्यघटना स्वीकारण्याच्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने २६ नोव्हेंबर रोजी हे संयुक्त सत्र बोलावले जाऊ शकते. हे सत्र संसदेच्या जुन्या इमारतीत बोलावले जाऊ शकते. यासाठी स्पेशल जॉइंट सिटिंगची व्यवस्था जुन्या संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये केली जाण्याची शक्यता आहे. याच ठिकाणी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्य घटनेचा स्वीकार करण्यात आला होता. यासाठीच २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारताने २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला होता.

विशेष म्हणजे सत्ताधारी एनडीए आणि विरोधी इंडिया आघाडी या दोन्ही गटांनी असा दावा केला आहे की, ते संविधानाचे रक्षक आहेत. भाजप आणि काँग्रेस यांनी एकमेकांना राज्यघटनेचे शत्रू असल्याची टीका लोकसभा निवडणुकीपासून केली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेससह विरोधकांनी मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास संविधान धोक्यात येईल, असा प्रचार केला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR