15.2 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeमहाराष्ट्रपाडव्याला पत्नीला माघारीचे गिफ्ट;

पाडव्याला पत्नीला माघारीचे गिफ्ट;

नांदेड : विशेष प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत अनेक मतदार संघात चुरशीच्या लढती होत आहेत. पण त्यात अनेक लढती या कुटुंबातच किंवा नात्यात होत असल्याचेही समोर आले आहे. कुठे बापा विरुद्ध लेक, तर कुठे भावा विरोधात भाऊ अशा लढती दिसत आहेत. अशीच एक चर्चेतील लढत होत होती ती म्हणजे लोहा विधानसभा मतदार संघात पती विरोधात पत्नी मैदानात उतरले होते. पण पाडव्याच्या दिवशी पतीने पत्नीसाठी असं काही गिफ्ट दिलं ज्याची चर्चा आता जोरदार होत आहे. त्यामुळे सध्याचे राजकारण पाहाता नातं खरोखर असंही असतं का? असं ही बोललं जात आहे.

नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदार संघात शामसुंदर शिंंदे हे विद्यमान आमदार आहेत. ते शेतकरी कामगार पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरले होते. त्याच वेळी त्यांची पत्नी आशा शिंदे यांनीही उमेदवारी दाखल केली होती. त्यामुळे पती विरोधात पत्नी असे चित्र निर्णाण झाले होते. घरात एकमेकाला विरोध असेही बोलले जात होते. त्यामुळे कोण माघार घेणार? याचीही चर्चा मतदार संघात होत होती.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या एक दिवस आधी पतीने मात्र पत्नीला आनंदाचा धक्का दिला. तो ही पाडव्याच्या मुहूर्तावर. दिवाळी पाडव्याला पतीकडून पत्नीला काही तरी भेट देण्याची परंपरा आहे. पत्नीला ही या भेटीची प्रतिक्षा असते. अशा वेळी शामसुंदर शिंदे यांनी आपली उमेदवारी मागे घेत पत्नीस पाठिंबा जाहीर केला. पतीने दिलेल्या या अनोख्या भेटी मुळे आशा शिंदे ही खुश झाल्या आहेत.

लोहा विधानसभा मतदार संघातून भाजपने प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी दिली. माजी खासदार असलेले चिखलीकर विधानसभेच्या निवडणुकीत उतरले आहेत. शामसुंदर शिंदे यांच्या पत्नी आशा श्ािंदे या त्यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे एकीकडे पतीने माघार घेतली असली तरी दुसरीकडे मात्र भावाच्या विरोधात बहीण असा सामना रंगणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR