26.4 C
Latur
Saturday, December 28, 2024
Homeमहाराष्ट्रसतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले

सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले

कोल्हापूर : कोल्हापुरातील काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजेंनी अचानक उमेदवारी मागे घेऊन सतेज पाटलांना मोठा धक्का दिला आहे. या धक्क्यातून सतेज पाटील सावरलेले नाहीत. कार्यकर्त्यांच्या गराड्यात सतेज पाटील यांना रडू कोसळले. ही घटना माझ्या करिअरच्या दृष्टीने देखील परिणाम करणारी असेल, असे वक्तव्य सतेज पाटील यांनी केले आहे.

भुदरगड तालुक्यात राहुल देसाईंचा प्रवेश होता. त्यांना सहा महिने सांगत होतो की आमच्याकडे या. त्यांनी ५-६ हजार कार्यकर्त्यांचा मेळावा बोलविला होता. यामुळे आजच्या घडलेल्या घटनेनंतर तिकडे न जाऊन चालणार नव्हते. देसाईंना नाऊमेद करून चालणार नव्हते. मी येताना म्हटले की मला काय होईल माहिती नाही, कारण मी रडलेलो नाही, असे सतेज पाटील म्हणाले.

जे काही घडले ते तुमच्या सर्वांच्या समोर आहे. मी त्यावर आज टीका करणार नाही. त्याला समोरे जायचे सामर्थ्य तुम्ही मला द्यावे. अनेक संकटे आयुष्यात आली. नेहमी तुमच्यासारखी जिवाभावाची माणसे हीच माझी ताकद राहिलीय. २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला, त्यांनी माघार घेण्याचे सांगितले. मी त्यांना म्हटले की असे करू नका, एकाला दिलेली उमेदवारी माघार घेऊन तुम्हाला उमेदवारी दिली. कसली काळजी करू नका.

तुम्हाला काही झाले तर जबाबदार बंटी पाटील असेल. मी निघालो. ती स्थिती माझ्या हातात नव्हती. मी त्यांचा हात धरून थांबविणे हे उचित नव्हते. माझ्या हातून, तोंडून काही वाक्य जाऊ नये म्हणून मला काहींनी तुम्ही निघा असे सांगितले. म्हणून मी तिथून निघालो असे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR